महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Diwali Celebration : लुप्त होत चाललेल्या दिवाळी परंपरा, चला पुन्हा आनंद वाटूया... - लुप्त होत चाललेल्या दिवाळी परंपरा

दिवाळीचा (Diwali Celebration) सण जसा आनंद उत्साहाचा आहे, तसाच तो आनंद (LOST DIWALI TRADITION LETS REJOICE) वाटण्याचाही आहे. आताच्या दिवाळीत अनेक बदल झालेत त्यापैकी एक म्हणजे आनंद वाटण्याच्या पध्दती बदलल्या आहेत. काही पध्दतीतर लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातील एक गोष्ट म्हणजे दिवाळी ग्रेटींग कार्ड्स. दिवाळीच्या शुभेच्छा आप्त स्वकीय आणि मित्रांना देण्यासाठी पूर्वी अशी ग्रेटिंग कार्ड्स एकमेकांना पाठवण्याची पध्दत होती.

Diwali Celebration 2022
लुप्त होत चाललेल्या दिवाळी परंपरा

By

Published : Oct 10, 2022, 6:00 PM IST

Updated : Oct 10, 2022, 7:02 PM IST

दिवाळीचा (Diwali Celebration) सण जसा आनंद उत्साहाचा आहे, तसाच तो आनंद (LOST DIWALI TRADITION LETS REJOICE) वाटण्याचाही आहे. आताच्या दिवाळीत अनेक बदल झालेत त्यापैकी एक म्हणजे आनंद वाटण्याच्या पध्दती बदलल्या आहेत. काही पध्दतीतर लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातील एक गोष्ट म्हणजे दिवाळी ग्रेटींग कार्ड्स. दिवाळीच्या शुभेच्छा आप्त स्वकीय आणि मित्रांना देण्यासाठी पूर्वी अशी ग्रेटिंग कार्ड्स एकमेकांना पाठवण्याची पध्दत होती.

दिवाळी जवळ आली याचा पहिला अंदाज यायचा तो ग्रेटिंग कार्ड्सच्या दुकानांमुळे. वेगवेगळ्या आकाराची, आकर्षक कार्ड्स या दुकांनातून मांडून ठेवली जायची. यथावकाश पावले अशा दुकानाकडे वळायची आणि किती लोकांना आपल्याला कार्ड्स पाठवायची आहेत याचा अंदाज घेऊन खरेदी केली जायची. कार्ड्स बंद पाकिटात ठेवण्यासाठी वेगवेगळ्या रंगांची इन्व्हलप मिळत असत. दिवाळीची सुट्टी लागली की ग्रेटिंग कार्ड्स बनवण्याचीही लगबग घराघरात सुरू व्हायची. आपल्या हातून बनवलेली आकर्षक रंगसंगती, डिझाईन्सची ग्रेटिंग कार्ड्स बनवण्यात एक वेगळी सृजनशीलता आणि आपुलकी होती.

ज्याला दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत त्याचे नाव सुव्वाच्च अक्षरात लिहून पाकिट बंद व्हायचे. इन्व्हलपवर पत्ता लिहून, पोस्टाचे तिकीट चिकटवून हे पाकिट पोस्ट पेटीत पडायचे. पुढील दोन तीन दिवसाचा प्रवास करुन हे शुभेच्छा पत्र आपल्या आप्ताला मिळायचे. आपल्या जवळच्या नातेवाईकाने पाठवलेली शुभेच्छा पत्र आणि आकर्षक ग्रेटिंग कार्ड्स घेऊन जेव्हा पोस्टमन यायचा तेव्हा तो देवदूतासारखा भासायचा. हे आनंद वाटण्याचे भाग्य त्याकाळी पोस्टमनला मिळत असे.

आता अशी ग्रेटिंग कार्ड्सचे स्टॉल पूर्वीसारखे लागत नाहीत. मोजकेच लोक घरात आपल्या हातून ग्रेटिंग कार्ड्स बनवतात. पोस्टाच्या पेटीत हातावर मोजता येतील एवढीच पत्रे, शुभेच्छा, ग्रेटिंग कार्ड्स आता टाकली जातात. पोस्टमनलाही आनंद वाटण्याचे भाग्य दुर्लभ झाले आहे. याची जागा कृत्रीम एसएमएस, व्हट्सअप स्टीकर्स आमि सोशल मीडियावरील इतर चॅटने घेतली आहे. त्यातील क्रिएटिव्हीटी संपली असून फॉर्वर्डेड मेसेजेस पाठवण्यात धन्यता मानण्याचा आज काळ आला आहे. याला छेद द्यायचा असेल तर आपल्या मुलांना त्यांच्या क्रिएटीव्हिटीला वाव देण्यासाठी प्रोत्सहान दिले पाहिजे. सुंदर संदेश, सुभाषिते आणि डिझाईन्स बनवून ती आपल्या जवळच्या व्यक्तींना पाठवली तरी आनंद वाटण्याचे काम आपल्या हातून पुन्हा घडू शकेल.Diwali Celebration

Last Updated : Oct 10, 2022, 7:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details