दिवाळी (Diwali is celebrated) हा सण इतर सणांप्रमाणेच भारताच्या (India Diwali Celebration) विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने (different traditions in different states) साजरा केला जातो. लोक आपापल्या चालीरीती आणि परंपरेनुसार हा सण साजरा करतात. दिवाळीत अनेक ठिकाणी स्वच्छता आणि सजावटीसह लक्ष्मी व गणेश देवतांची पूजा करून साजरी केली जाते. अनेक ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करून हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. चला तर मग जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की, देशाच्या विविध भागात दिवाळी साजरी करण्याची परंपरा कश्या प्रकारे आहेत.Diwali Celebration
महाराष्ट्रातील दिवाळी : महाराष्ट्रात दिवाळीची सुरुवात वसु बारसच्या विधीने करण्याची परंपरा आहे. वसु बारस या दिवशी गायींची पूजा केली जाते. याशिवाय प्राचीन डॉक्टर धन्वंतरी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लोक धनत्रयोदशी साजरी करतात. दिवाळीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लोकही लक्ष्मीची पूजा करतात. या दरम्यान पती-पत्नीचे प्रेम साजरे करण्यासाठी 'दिवाळीचा पाडवा' साजरा केला जातो. 'भाऊ बीज' आणि 'तुलसी विवाह' ने उत्सवाची सांगता होते. यानंतर विवाहाचा शुभ मुहूर्त सुरू होतो.Diwali In Maharashtra
हिंदी भाषिक राज्यांमधील दिवाळी :आपल्या देशातील 10 हिंदी भाषिक राज्यांमध्ये, घर आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांची साफसफाई केली जाते. रंगरंगोटी करून लक्ष्मी व गणेशाची पूजादेखील केली जाते. तसेच आसपासच्या घरांमध्ये मिठाई आणि भेटवस्तूंचे वाटप करून दीपोत्सव साजरा केला जातो. येथील लोकांचा असा विश्वास आहे की, हा लंकेतील भगवान श्री रामाच्या विजयानंतर साजरा करण्यात येणारा सण आहे. या दिवशी लोक लक्ष्मी गणेशाच्या नवीन मूर्ती त्यांच्या घरी, कार्यालयांमध्ये आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये आणुन पूजा करतात.
याशिवाय वाराणसीतील गंगा घाट आणि अयोध्येतील सरयू येथे भव्य कार्यक्रमांचे आयोजन करून दिवाळी साजरी केली जाते. अयोध्येत सरयूच्या काठावर दीपावलीच्या दिवशी, तर वाराणसीमध्ये देव दीपावलीच्या दिवशी लाखो दिव्यांची सजावट केली जाते. या दिवशी नद्यांच्या काठावर वसलेल्या या दोन शहरांचे सौंदर्य पाहायला मिळते.Diwali in Hindi speaking states
पश्चिम बंगालमधील दिवाळी : पश्चिम बंगालमध्ये दीपावलीच्या दिवशी काली पूजा किंवा श्यामा पूजा करतात. या दिवशी देवी कालीला जासवंदाच्या फुलांनी सजविली जाते आणि मंदिरे आणि घरांमध्ये तिची विशेष पूजा केली जाते. यानंतर भक्त माँ कालीला मिठाई, डाळी, तांदूळ आणि मासे यांचा नैवेद्य दाखविला जातो. करतात. यासह, काली पूजेच्या एक रात्री, बंगालचे लोक भूत चतुर्दशी विधीदेखील करतात. त्यांच्या घरात 14 दिवे लावून वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी ही विधी केली जाते.Diwali in West Bengal