महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

DIWALI CELEBRATION: दिवाळीच्या रात्री का लावले जाते काजळ धार्मिक वैज्ञानिक कारणासह जाणून घ्या ते घरीच कसे बनते

मान्यतेनुसार, दिवाळीच्या रात्री दिव्यांनी तयार केलेले काजळ लावल्याने (REASON OF APPLYING KAJAL ON DIWALI NIGHT) दृष्टी खराब होत नाही. म्हणूनच दिवाळीच्या रात्री लावलेल्या दिव्यापासून काजल बनवली (HOW TO MAKE KAJAL ON DIWALI HOMEMADE KAJAL) जाते. यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारणही आहे. तर आज आपण याबाबत पंडीतजींचे काय मत आहे, ते जाणुन घेऊया. DIWALI CELEBRATION .LAKSHMI PUJAN

DIWALI CELEBRATION
दिवाळीच्या रात्री डोळ्यांना काजळ

By

Published : Oct 19, 2022, 1:30 PM IST

भोपाळ : आपल्या ठिकाणी प्रत्येक सण वेगवेगळ्या रितीरिवाजांनी साजरा केला जातो. दिवाळीतही अशाच काही प्रथा प्रचलित आहेत. मान्यतेनुसार, दिवाळीच्या रात्री दिव्यापासून बनवलेली काजळ लावल्याने (REASON OF APPLYING KAJAL ON DIWALI NIGHT) दृष्टी चांगली राहाते. म्हणूनच दिवाळीच्या रात्री लावलेल्या दिव्यापासून काजल बनवली (HOW TO MAKE KAJAL ON DIWALI HOMEMADE KAJAL) जाते. यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारणही आहे. तर आज आपण याबाबत पंडीतजींचे काय मत आहे, ते जाणुन घेऊया. DIWALI CELEBRATION .LAKSHMI PUJAN

यंदाची दिवाळी आहे खास : यंदा 24 ऑक्टोबरला दिवाळीचा सण साजरा होणार आहे. ही दिवाळी खूप खास असणार आहे. कारण 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 4:44 वाजता अमावस तिथी येत आहे. त्यापूर्वी चौदस असेल. 25 तारखेला सूर्यग्रहण होणार आहे. म्हणूनच या दिवाळी पूजेमध्ये मुहूर्ताची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

काजळ लावण्याचे धार्मिक कारण : वडीलधारी मंडळी हे उपाय पूर्वीपासून करत आहेत. दीपावलीच्या दिवशी दृष्ट काढण्याची पद्धत खूपच खास मानली जाते. यादिवशी घरातील सर्व सदस्यांना एकत्र बसवून मोहरी, मीठ आणि लाल मिरच्यांनी नजर काढली जाते. असे मानले जाते की, या दिवशी काजळ लावल्याने वर्षभर डोळ्यांचे आजार कधीच होत नाहीत. तसेच काजळ लावल्याने आपल्या कुटूंबाला वाईट दृष्ट लागत नाही.

काजळ लावण्याचे वैज्ञानिक कारण :दीपावलीच्या दिवशी प्रदूषणामुळे आपल्या डोळ्यांना खूप नुकसान होते, त्यामुळे रात्री दिव्यापासून बनवलेले काजल लावल्याने डोळे शुद्ध होतात, असे वैज्ञानिकांचेही मत आहे. या सर्व कारणांमुळे दीपावलीच्या रात्री काजळ लावण्याचे विशेष महत्त्व आहे.

अशा प्रकारे बनवा काजळ : दीपावलीच्या रात्री लावलेल्या दिव्याची काजळ बनवण्यासाठी (HOW TO MAKE KAJAL ON DIWALI HOMEMADE KAJAL) मोठ्या दिव्यामध्ये तुपाची वात तयार करून ती जाळून टाकावी. नंतर त्यावर मातीचा दिवा लावावा. या दरम्यान दिवा विझणार नाही हे लक्षात ठेवा. काही वेळ दिवा ठेवल्यानंतर त्यातील दिवा काढून टाका. मग दिव्यावरील कार्बन किंवा धुळीचे कण सुती कापडाने हळुच काढून टाकल्यानंतर, उरलेली काजळ एका डबित ठेवा. त्यात तूप मिसळवा आणि आता तुमची काजळ तयार आहे, तुम्हाला हवी तेव्हा लावू शकता.

दीपावलीच्या पूजेत झोपणे वर्ज्य आहे : दीपावलीच्या रात्री लक्ष्मीजींचे आगमन होते. पंडितांच्या मते, त्यामुळे या दिवशी झोपू नये. या दिवाळीच्या संध्याकाळी ४:४४ पासून अमावस सण येत आहे. त्यामुळे या दिवशी रात्रीचा मुहूर्त व्यापाऱ्यांसाठी शुभ मानला जातो. चतुर्दशी तिथी : 24 ऑक्टोबर, दुपारी 4:44 ते अमावस्या तिथी सुरु होणार आहे. दीपावली मुहूर्त : 24 ऑक्टोबर, 4:44 वाजता सुरु होणार आहे. दीपावली पूजेचा शुभ मुहूर्त :घरातील दीपावलीच्या पूजेसाठी संध्याकाळी 6:53 ते 8:49 पर्यंत शुभ मुहूर्त आहे. DIWALI CELEBRATION .LAKSHMI PUJAN

ABOUT THE AUTHOR

...view details