आपल्या देशात साजरा केला जाणारा दिपावली हा दिव्यांचा सण साजरा करण्याची परंपरा हळूहळू परदेशातही (DIWALI CELEBRATION IN FOREIGN COUNTRIES BY NRIS AND OTHERS) पोहोचली आहे. दीपोत्सव आता केवळ हिंदू किंवा हिंदुस्थानपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर हळूहळू जगातील अनेक भागांमध्ये तो आनंदाने साजरा केला जातो. जगात असे अनेक देश आहेत, जिथे दिव्यांचा हा सण सामील आहे. DIWALI CELEBRATION
भारताचे शेजारी देश करतात दिवाळी साजरी :आज ईटीव्ही इंडियाच्या माध्यमातून आपण जाणुन घेणार आहोत की, कोणत्या देशांमध्ये दिवाळी खास पद्धतीने साजरी केली जाते. भारताचे अनेक शेजारी देश आहेत जसे की, श्रीलंका, म्यानमार, थायलंड, मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फिजी, मॉरिशस, केनिया, टांझानिया, दक्षिण आफ्रिका, गयाना, सुरीनाम, त्रिनिदाद आणि टोबॅगो, नेदरलँड, असे सर्वसाधारणपणे दिसून येतात. कॅनडा, ब्रिटन आणि अमेरिकेत दिवाळी उत्साहात साजरी केली जाते. याशिवाय अनेक देशांमध्ये दिवाळी विशेष प्रकारे साजरी केली जाते. ज्यामध्ये लोक फटाके फोडतात आणि आपापल्या पद्धतीने दिवाळी साजरे करतात. या देशांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाणारे हे सण साजरे करण्यामागेही वेगवेगळ्या समजुती आहेत. अनेक ठिकाणी काही विशेष विधी देखील केले जातात.
लंडन सजते वधु प्रमाणे : परदेशात अनिवासी भारतीय देखील दिवाळी साजरी करतात. भारतात ज्याप्रमाणे दिवाळी संपूर्ण उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते, त्याचप्रमाणे ग्रेट ब्रिटन लंडनमध्येही दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. ब्रिटिशांनाही हा सण खूप आवडतो. असे म्हटले जाते की, दिवाळी हा सण भारतानंतर इंग्लंडमध्येच सर्वात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दीपावलीनिमित्त लंडनकरांचा उत्साह पाहाण्याजोगा असतो. या दिवशी लंडनला वधूप्रमाणे सजवले जाते.
ब्रिटनमध्ये साजरी होते दिवाळी : याशिवाय ब्रिटनच्या जंगलांनी वेढलेल्या लेस्टर या सुंदर शहरात राहणारे हिंदू, जैन आणि शीख समुदाय दीपावली मोठ्या थाटामाटात साजरी करतात. त्यांना पाहून येथे राहणारे इतर धर्माचे लोकही त्यात सहभागी होतात आणि आनंद साजरा करतात. भारताप्रमाणेच, दिवाळीच्या दिवशी, लोक उद्यानांमध्ये आणि मोठ्या रस्त्यांवर समूहाने एकत्र येतात आणि फटाके फोडतात. याशिवाय लोक त्यांच्या नातेवाईकांना, शेजाऱ्यांना मिठाई आणि भेटवस्तू देखील देतात.
ओनिओ फेअर फेस्टिव्हल : दीपावलीप्रमाणे जपानमध्येही ओनिओ फेअर फेस्टिव्हल मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हा सण दरवर्षी जानेवारी महिन्याच्या आसपास साजरा केला जातो. ओनो फेस्टिव्हल हा जपानमधील सर्वात जुन्या सणांपैकी एक आहे. इथे फुकुओकामध्ये दीपावलीसारखा प्रकाशोत्सवही थाटामाटात साजरा करण्याची परंपरा आहे. या दरम्यान 6 मशाल प्रज्वलित केल्या जातात, जे आपत्तीच्या समाप्तीचे प्रतीक आहे. यामध्ये मंदिरातील अग्निदिव्य बाहेर काढून, दुसऱ्या ठिकाणी नेण्याची परंपरा आहे. जपानी लोक खास पांढरे कपडे घालतात आणि दिवे सगळीकडे फिरवतात. याशिवाय तिथे आगीसोबत खेळत अनेक आश्चर्यकारक कला देखील दाखविल्या जातात. हा जपानचा मोठा आणि शुभ सण मानला जातो.
फ्लोरिडामध्ये दिवाळी :31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत दरवर्षी साजरा होणारा 'सामहेन' उत्सव. फ्लोरिडाच्या अल्तुना शहरात अतिशय नेत्रदीपक पद्धतीने आयोजित केला जातो. ते पाहण्यासाठी लांबून लोक येतात. भूतांच्या स्मरणार्थ आयोजित या उत्सवात विशेष प्रकारची अग्नी पेटवली जाते. वेगवेगळ्या थीमवर आणि मनोरंजनासाठी आयोजित केलेला हा महोत्सव पाहण्यासाठी इतर देशांतून लोक येतात. या दरम्यान, हे लोक लोकांना अनेक आश्चर्यकारक पराक्रम देखील दाखवतात, ज्याचा स्थानिक लोक तसेच बाहेरील लोक प्रचंड आनंद घेतात.
थायलंडमधील दिवाळी : थायलंडमध्ये लाम क्र्योंग या नावाने दीपावली साजरी करण्याची परंपरा आहे. या दिवशी येथील लोक आपापल्या धार्मिक श्रद्धेनुसार रात्री केळीच्या पानांपासून बनवलेला दिवा आणि उदबत्ती लावून पूजा करतात. यादरम्यान ते तेथे पैसेही ठेवतात. मग जळत असलेला दिवा ते नदीच्या पाण्यात टाकतात.
नेपाळमधील दिवाळी :तिहार उत्सव नेपाळमध्ये दिवाळीला साजरा केला जातो, ज्यामध्ये कुत्र्यांची पूजा केली जाते. हिंदू समाजातील लोक देखील दिवाळीच्या या पाच दिवसांच्या उत्सवात एक दिवस (गायीची पूजा) प्राण्यांची पूजा करतात. तर नेपाळ येथे कुत्र्यांची विशेष पूजा केली जाते. नेपाळी हिंदूंचा हा सण पृथ्वीवर राहणार्या सर्व प्राण्यांचे परस्पर संबंध लक्षात ठेवण्याचा एक मार्ग मानला जातो. सभ्यतेच्या सुरुवातीपासून मानव आणि प्राणी यांच्यातील मैत्री टिकवून ठेवण्यासाठी आणि दोघांचे नाते आणि उपयुक्तता टिकवून ठेवण्यासाठी अनेक देशांमध्ये विशेष सण साजरे केले जातात.
सिंगापूरमधील दिवाळी :सिंगापूरमध्ये अनेक देशांतील लोक एकत्र दिवाळी सण साजरा करतात. यासाठी खास बसेसमध्ये रांगोळीच्या पारंपारिक डिझाईन्स बनवल्या जातात, ज्या दिसायला अतिशय सुंदर असतात. सिंगापूरमधली दिवाळीची छायाचित्रे बघितली की जणू भारतच आहे, असे जाणवतं. येथेही लोक मिठाई आणि फटाक्यांची देवाणघेवाण करतात.
अमेरिकेतील दिवाळी :अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये हा सण अनिवासी भारतीय मोठ्या थाटामाटात साजरा करतात. गेली अनेक वर्षांपासुन त्या ठिकाणचे अध्यक्षही त्यात रस घेतांना दिसत आहे. यावेळीही राष्ट्राध्यक्ष जो बाइडेन यांनी 24 ऑक्टोबर रोजी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्याची घोषणा केली आहे. त्याच वेळी, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 21 ऑक्टोबर रोजी फ्लोरिडातील त्यांच्या मार-ए-लागो रिसॉर्टमध्ये हा उत्सव साजरा करण्याची योजना आखली आहे. जो बाइडेन यांनी भारतीय अमेरिकन समुदायातील प्रतिष्ठित सदस्य आणि त्यांच्या प्रशासनातील सदस्यांसोबत दिवाळी साजरी करण्याची योजना आखली आहे. तर फर्स्ट लेडी जिल बाइडेन यांनी 24 ऑक्टोबर रोजी व्हाईट हाऊसमधील उत्सवाला उपस्थित राहण्याची घोषणा केली आहे.
कॅनडातील दिवाळी :कॅनडाच्या न्यूफाउंड लँडमध्ये 5 नोव्हेंबर रोजी दीपावलीसारखा उत्सव साजरा केला जातो. येथे फटाक्यांच्या आनंदामागे एक खास कारण सांगितले आहे. असे म्हणतात की, ब्रिटिश आणि आयरिश लोक चांगल्या जीवनाच्या शोधात येथे आले होते. त्यामुळे कॅनडा तयार झाला आणि स्थायिक झाला. या दरम्यान, बोनफायर आयोजित करून मजा केली जाते. इथे गंमत म्हणजे अनेक लोक आपल्या देशात दिवाळीला ज्या पद्धतीने घर रंगवतात, त्याच पद्धतीने कॅनडातील लोक घर आणि खिडक्या रंगवतात. DIWALI CELEBRATION