यंदा (Diwali Celebration) दिवाळी 21 ऑक्टोबर पासून 26 ऑक्टोबरपर्यंत आहे. दिव्यांची आणि आनंदाची उधळण करणारा असा हा सण प्रत्येकाच्या आयुष्यासाठी शुभ व्हावा म्हणून, अनेक गोष्टींची तुम्ही काळजी घेतल्यास तुम्हाला फायदा होईल. वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असा हा दिवाळीचा सण मोठ्या उत्साहाता देशभरात साजरा होतो. दिवाळीत फराळ, सजावटीसोबतच घराची साफसफाई महत्त्वाची आहे. जाणुन घेऊया कशी करावी सुरक्षितपणे (Do not make this mistake while cleaning in Diwali) घराची साफसफाई. Safe Diwali Happy Diwali
चुकुनही करु नका ही चुक :दिवाळी म्हणटलं की, सर्वप्रथम घरातील महीलांच्या डोळ्यापूढे येते ती घरातील साफसफाई. घरातील केर काढण्यापासुन ते दारे, खिडक्या व एकुण एक गोष्ट स्वच्छ करण्यासाठी महीला दक्ष असतात. सोबतच स्वयंपाक घर आवरतांना महीलांची प्रचंड दमछाक होत असते. मात्र, हे सगळं करित असतांना महीलांनी स्वत:ची काळजी घेणे देखील तेवढेच आवश्यक आहे. परंतु, बऱ्याच ठीकाणी याच्या विपरित होतांना दिसुन येते. जसे की, विजेची उपकरणे बंद न करताच ती स्वच्छ करणे, पायात पादत्राणे न वापरता विजेच्या वस्तु हाताळणे, स्वच्छता करतांना पायाच चप्पल न घालणे, काचेच्या वस्तु योग्य प्रकारे न हाताळणे, जिवावर जोखीम ओढवुन स्वच्छता करणे, ईत्यादी अनेक गोष्टी महीलांच्या हातुन कळत-नकळत घडत असतात.
सुऱक्षित व आनंदी दिवाळी :दिवाळी हा आनंदाचा व उत्सहाचा सण आहे. तेव्हाघराची साफसफाई करतांना जर का आपण थोडी काळजी घेतली तर, आपण आपल्या कुटूंबासह सुरक्षित आणि आनंदी दिवाळी आपण साजरी करु शकताे. याशिवाय आज आपण जाणुन घेणार आहोत की, कशी करावी घराची स्वच्छता. काय करावे आणि काय करु नये.
'या' वस्तू घरात ठेवू नका :खराब वस्तू, जुने कपडे, तुटलेली भांडी, जुनी आणि साचलेली घाण, देवाच्या तुटलेल्या मूर्ती किंवा फोटो, घराच्या ईशान्य कोपऱ्यात कोणतीही धारदार किंवा तुटलेली वस्तू ठेवू नका, घरात कोणतेही हिंसक प्राणी किंवा नकारात्मक फोटो ठेवू नका.