हैदराबाद - दिवाळीच्या शुभमुहूर्तावर हैदराबादमधील जगप्रसिद्ध रामोजी फिल्म सिटी पर्यटकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. रामोजी फिल्मसिटीमध्ये दिवाळी कार्निव्हल सुरू झाला आहे. रंगीबेरंगी प्रकाशयोजना, मनमोहक संगीत आणि नृत्य सादरीकरणे येथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करत आहेत.
रामोजी फिल्म सिटी (RFC) ला भेट देणारे पर्यटक दिवाळी कार्निव्हल बधून मंत्रमुग्ध होत आहे. फिल्मसिटीच्या सुंदर इमारती आणि प्रेक्षणीय स्थळे त्यामुळे दिवाळी कार्निव्हल पाहण्यासारखे आहे. महत्त्वाचे म्हणजे रामोजी फिल्मसिटी व्यवस्थापनाच्यावतीने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी (आरोग्याच्या दृष्टीने) विशेष काळजी घेण्यात आली आहे. हा कार्निव्हल 14 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
रामोजी फिल्म सिटीमधील काही आकर्षणे आणि प्रेक्षणीय स्थळे..
- युरेका -
शाही मध्ययुगीन किल्ल्यांच्या धर्तीवर युरेका बनविण्यात आली आहे. नृत्य-गीतांचे कार्यक्रम, लहान मुलांसाठी खेळण्याचे कोर्ट, रेस्टॉरंट, थीम बाजार युरेकामध्ये समाविष्ट आहेत. डोळ्यांच्या पापण्या न लवतात तोच वेगवेगळ्या युगात भटकायला मिळते. किल्ल्यांवर असतात तसे मनोरंजक बुरुज आपल्याला मोगलांची भव्यता अनुभवण्यास मोहित करतात. येथे तुम्हाला मौर्यांचे वैभव आणि अमेरिकन वाइल्ड वेस्टचे मनमोहक आकर्षणही अनुभवता येते. नृत्य आणि गाण्याची मैफल, प्ले कोर्ट, वेगवेगळ्या थीमवर आधारित रेस्टॉरंट्स यासह मध्ययुगीन मीना बाजारात खरेदीचा इथे मनसोक्त आनंद घेता येतो.
- फंडुस्तान आणि बोरासुरा -
विशेषकरून लहान मुलांसाठी फंडुस्तान आणि बोरासुरा यांची रचना करण्यात आली आहे. तरुणांची विचार करण्याची प्रचंड क्षमता आणि त्यांच्यातील अपार ऊर्जा यांचा यामध्ये विचार करण्यात आला आहे. या ठिकाणी प्रवेश केला, की सुरू होतो थरार, राइड्स आणि विविध खेळांचा मनोरंजक प्रवास! बोरासुरा - लहान मुलांसाठी हा एक धडकी भरवणारा मात्र रोमांचक अनुभव आहे. ही एकप्रकारची जादुई गुहा आहे. आपण या गुहेत जसजसे पुढे जाल, तसे रहस्यमय चक्रव्यूह भासते. आपल्याला धडकी भरवणाऱ्या प्रतिमा आणि भयानक आवाजांचा थरारक अनुभव मिळतो. येथील रहस्यपूर्ण गोष्टींच्या अनुभवातून तुमच्या अंगावर शहारे येतील. या काळ्याकुट्ट गुहेत पुढे काय येईल याची तुम्हाला जरासुद्धा कल्पना नसते... त्यामुळे जरा जपूनच पावले टाका!
- रामोजी मुव्ही मॅजिक -
रामोजी मुव्ही मॅजिकद्वारे फिल्म आणि फॅन्टसी यांची ओळख करून दिली जाते. चित्रपट निर्मितीतील गुंतागुंत, स्पेशल इफेक्ट, एडिटिंग, डबिंग आदींची ओळख करून दिली जाते. फिल्मी दुनियेत कल्पनाविश्वातील सफर घडवली जाते.
- रामोजी स्पेस यात्रा -
अवकाशातील सफर घेण्याचा आनंद या ठिकाणी मिळतो. येथे तुम्ही अंतराळ यानात बसून आकाशगंगेची सफर करू शकता. चित्रपट निर्मितीमधील अॅक्शनचा स्वतः अनुभव घेता येतो. या संवादात्मक शोमधून तुम्हाला चित्रपट निर्मितीच्या उत्तम टिप्स मिळतात. येथील 'फिल्मी दुनिया' मध्ये तुम्ही कल्पनारम्य डार्क राईडचा अनुभव घेता येतो. अल्लाद्दीनचा राजवाडा आणि तेथील चमत्कारी विश्व पाहून तुम्ही आश्चर्यचिकत होता.
- लाइव्ह शो -
विविधरंगी लाइव्ह शो हे रामोजी फिल्म सिटीचे आकर्षण आहे. विविध कलाकार आपल्या सादरीकरणातून देशातील सांस्कृतिक वैविधता दर्शवितात. ६०च्या दशकातील हॉलिवूड काऊबॉयप्रमाणे वाइल्ड वेस्ट स्टंट शो पाहायला मिळतात. तर बॅकलाइट शोच्या माध्यमातून प्रतिभाशाली कलाकारांचे परफॉर्मन्स अॅनिमेशन स्वरूपात दाखवले जातात. रामोजी फिल्म सिटीमधील रंगीबेरंगी मनोरंजनाच्या विविधांगी कार्यक्रमांचा अनुभव घेता येतो. येथील अद्भुत लय आणि तालबद्ध नृत्याचे लाईव्ह शो पाहताना तुमचेही पाय आपोआप थिरकतात. थरारक वाइल्ड वेस्ट शो आणि अनोख्या पोषाखातील ब्लॅकलाइट शो यांचा अनोखा संगम तुम्हाला अद्भुत असा अनुभव देतो.
- गाइडेड टूर -