महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Diwali and Chhath in 2023 on Sunday : 2023 मध्ये दिवाळी-छठ पूजा दोन्ही रविवारी, जाणून घेऊया सविस्तर

दिवाळी हा सण कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो. 2023 मध्ये दिवाळी हा सण 12 नोव्हेंबर रविवार (Diwali On 12 November Sunday) रोजी आहे. तर, छठ पूजा हा सण १९ नोव्हेंबर रविवार (Chhath On 19 November Sunday) रोजी आहे. नोव्हेंबर महिन्यातील हिंदू धर्मातील हे दोन्ही सण वेगवेगळ्या तारखेला मात्र रविवार च्या दिवशीच (Diwali and Chhath in 2023 on Sunday) आलेले आहेत.

Diwali and Chhath in 2023 on Sunday
दिवाळी-छठ पूजा दोन्ही रविवारी

By

Published : Jan 1, 2023, 4:05 PM IST

दिवाळी सण (Diwali On 12 November Sunday) दरवर्षी कार्तिक महिन्याच्या अमावास्येला साजरा केला जातो. पाच दिवसांचा दिवाळी सण धनत्रयोदशीपासून सुरू होतो आणि भाईदूजपर्यंत चालतो. हे पाच दिवस प्रत्येक घरात दिवे लावले जातात. असे मानले जाते की, दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते. तर कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सहाव्या तिथीला छठ हा सण साजरा (Chhath On 19 November Sunday) केला जातो. हा सण आपल्या संपुर्ण कुटूंबाच्या आरोग्य आणि समृध्दीसाठी साजरा केला जातो. 2023 मध्ये छठचा सण कधी आहे ते जाणुन घेऊया. Diwali and Chhath in 2023 on Sunday

दिवाळी 2023 तारीख कॅलेंडर :दिवाळीत लक्ष्मीजींची विधिवत पूजा केल्याने जीवनात आनंद आणि सौभाग्य टिकून राहते आणि जीवनातील पैशाची कमतरता दूर होते. ज्या घरात सर्वत्र प्रकाश असतो, त्या घरात महालक्ष्मीचा वास असतो. 2023 मधील धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, दीपावली, गोवर्धन पूजा आणि भाईदूज या पाच दिवसांच्या दिवाळी सणाची तारीख जाणून घेऊया.

दिवाळी 2023 : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. या दिवसापासून दिवाळीचा पाच दिवसांचा सण सुरू होतो. आयुर्वेदाचे जनक मानले जाणारे 'भगवान धन्वंतरी' यांची धनत्रयोदशीला पूजा केली जाते. सोने, चांदी, वाहन इत्यादी खरेदीसाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी यमाच्या नावाने दिवे लावले जातात.

नरक चतुर्दशी 2023 : 12 नोव्हेंबर 2023 रोजी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी ही नरक चतुर्दशी आणि रूप चौदस म्हणून ओळखली जाते. या दिवशी उटनं लावुन, आंघोळ करून सोंदर्य वाढविण्याचा विधी आहे. पौराणिक मान्यतेनुसार या कृष्णाने नरकासुराचा वध केला होता. कॅलेंडरमधील फरकामुळे 2022 प्रमाणेच नरक चतुर्दशी आणि दिवाळी सण एकाच दिवशी साजरे केले जातील. दिवाळीत संध्याकाळी महालक्ष्मीची पूजा केली जाते.

गोवर्धन पूजा 2023 :कार्तिक महिन्याच्या प्रतिपदेला गोवर्धन पूजा होते. पुढील वर्षी, ही तारीख 13 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 02:56 वाजता सुरू होत आहे आणि 14 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 02:36 वाजता संपेल. उदयतिथीनुसार 14 नोव्हेंबरला अन्नकूट आणि गोवर्धन पूजा साजरी होणार आहे.

भाऊ बीज 2023 :दिवाळीच्या दोन दिवसांनी म्हणजेच कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाईदूज साजरा केला जातो. हा दिवस भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे. भाई दूजच्या दिवशी बहीण आपल्या भावाला टिळक लावते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देते.

छठ 2023 तारीख :नवीन वर्षात 17 नोव्हेंबर 2023 ते 20 नोव्हेंबर 2023 या कालावधीत छठ हा सण साजरा केला जाईल. छठ हा सण चार दिवस चालतो. याची सुरुवात 17 तारखेला होईल, त्यानंतर दुसऱ्या दिवशी खरना, तिसऱ्या दिवशी मावळत्या सूर्याला अर्घ्य आणि चौथ्या दिवशी उगवत्या सूर्याला जल अर्पण केले जाते. छठ पूजा १९ नोव्हेंबर २०२३ रोजी आहे.

छठचे महत्व :छठ पूजेमध्ये भगवान सूर्य आणि छठी मैय्याची पूजा करण्याचा नियम आहे. या महान सणात जो 36 तास निर्जल व्रत पाळतो आणि नियमानुसार जो पूजा करतो, त्यांना मुलांचे सुख, बालकांचे उत्तम आरोग्य, सूर्यासारखे तेज, बल प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. षष्ठी देवीच्या कृपेने मुलांवर येणारे प्रत्येक संकट नष्ट होते. या उत्सवाची सुरुवात सर्वप्रथम सूर्यपुत्र कर्णाने सूर्याची आराधना करून केली असे म्हणतात. मान्यतेनुसार ते तासन्तास पाण्यात राहून सूर्याची पूजा करत असत. त्यामुळे सूर्याच्या कृपेने त्यांना महान योद्धा बनण्याची संधी मिळाली.

ABOUT THE AUTHOR

...view details