लेप्चा (हिमाचल प्रदेश)PM Narendra Modi Visit Himachal : सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिमाचल प्रदेशातील लेप्चा इथं पोहोचले आहेत. इथं पंतप्रधान दरवर्षी सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. पंतप्रधानांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल X (पुर्वीचं ट्विटर) वर त्याचे फोटोही शेअर केले आहेत. X वर पोस्ट शेअर करताना पंतप्रधानांनी लिहिलं की, 'आमच्या शूर सुरक्षा दलांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी हिमाचल प्रदेशच्या लेप्चा इथं पोहोचलो'. पंतप्रधान मोदींनी सर्व देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी सीमेवरील जवानांसोबत दिवाळी साजरी करतात.
पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत कुठं-कुठं दिवाळी केली साजरी : नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्याची एक प्रकारे प्रथाच सुरु केली. पंतप्रधानांनी 2014 मध्ये सियाचीन ग्लेशियर, 2015 मध्ये पंजाबमधील अमृतसर, 2016 मध्ये हिमाचल प्रदेशातील किन्नौर आणि 2017 मध्ये काश्मीरमधील गुरेझ येथे सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती. त्यानंतर 2018 मध्ये पंतप्रधानांनी उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये आणि 2019 मध्ये जम्मू विभागातील राजौरीमध्ये लष्करी जवानांसोबत दिवाळी साजरी केली. तर 2020 मध्ये पंतप्रधानांनी राजस्थानमधील जैसलमेर, 2021 मध्ये राजौरी जिल्ह्यातील नौशहरा आणि 2022 मध्ये कारगिलमध्ये दिवाळी साजरी केलीय.
लष्करी परिषदेला करणार संबोधित : पंतप्रधान मोदी ज्योदिया येथील राख मुठी भागात जवानांसोबत दिवाळीची मिठाई खाण्याचा आनंद घेणार आहेत. तसंच दुपारी दिल्लीला परतण्यापूर्वी पंतप्रधान सैन्यदलाच्या परिषदेलाही संबोधित करतील अशी माहिती सुत्रांनी दिली. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी आंतरराष्ट्रीय सीमा, नियंत्रण रेषा किंवा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सैनिकांमध्ये दिवाळी साजरी करत आहेत. यंदाही त्यांनी हे कायम ठेवलंय.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लेप्चा खूप महत्त्वाचा : दरवर्षी पंतप्रधान सीमेवर जाऊन सैनिकांसोबत दिवाळी साजरी करून त्यांना प्रोत्साहन देतात. पंतप्रधान मोदींच्या लेप्चा दौऱ्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीय. आज जिथं पंतप्रधान मोदींनी सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली, तो भाग भारताच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जातो. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भागात जाऊन सुरक्षा जवानांसोबत दिवाळी साजरी करणं अनेक अर्थानं महत्त्वाचं आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी जवानांशी चर्चा करून तेथील परिस्थितीचा आढावाही घेतला.
हेही वाचा :
- Diwali 2023 wishes : पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह विविध राजकीय नेत्यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा!
- narendra modi to burn Effigy ravana : 4 वर्षांनंतर पंतप्रधान मोदी द्वारकेत रावण दहन करणार, रामलीला मैदानावर कडक पोलीस बंदोबस्त
- PM Vishwakarma Yojana : पीएम विश्वकर्मा योजनेचा 'श्रीगणेशा', पंतप्रधानांकडून जागतिक दर्जाच्या एक्स्पो सेंटरचे उद्घाटन