रायपुर (छत्तीसगड):बागेश्वर धाम मध्य प्रदेशातील छतरपूर जवळ आहे. तेथील बाबा धीरेंद्र शास्त्री हे परमात्म्याच्या नावाने दरबार भरवत असतात. या दरबारात ते कथाही सांगतात आणि लोकांच्या समस्या सोडवण्याचा दावा करतात. याठिकाणी लोक त्यांच्या समस्या घेऊन येतात. धीरेंद्र शास्त्री हे लोकांच्या समस्या कागदावर लिहून देतात. या समस्यांवर ते उपायही सांगत असल्याचे कळते. त्यांच्या या दाव्यावरच अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून आक्षेप घेण्यात आला आहे.
बागेश्वर धामबाबत काय सांगितले जाते?: धीरेंद्र शास्त्रींना हनुमानजी आणि त्यांच्या दिवंगत आजोबांचा इतका आशीर्वाद लाभला की, त्यांना दैवी अनुभूती जाणवू लागली आणि त्यांनी लोकांच्या दु:ख दूर करण्यासाठी आजोबांप्रमाणे 'दिव्य दरबार' आयोजित करण्यास सुरुवात केली. धीरेंद्र शास्त्री सांगतात की, त्यांनी हनुमानजी आणि सिद्ध महाराजांचे प्रत्यक्ष दर्शन घेतले आहे. वयाच्या 9 व्या वर्षी त्यांनी हनुमानजी बालाजी सरकारची भक्ती, सेवा, ध्यान आणि उपासना सुरू केली. या साधनेचा त्यांच्यावर इतका परिणाम झाला की बालाजींच्या कृपेने त्यांना लोकांचे विचार कळू लागले, असे म्हणतात. बागेश्वर धाममध्ये मंगळवारी अर्ज केला जातो. अर्ज करण्यासाठी लोक आपली इच्छा सांगून लाल कपड्यात नारळ बांधतात, तो नारळ येथे एका ठिकाणी बांधतात आणि रामनामाचा जप करतात आणि मंदिराची 21 परिक्रमा करतात.
बागेश्वर धाम कुठे आहे: बागेश्वर धाम मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गाडा गावात आहे. येथे हनुमानजीचे मंदिर आहे. या मंदिराजवळ धीरेंद्र कृष्णाचे आजोबा आणि गुरुजींची समाधी बांधलेली आहे. लोक मंगळवारी येथे येतात आणि त्यांच्या समस्या अर्ज करून मांडतात. बागेश्वर धाममध्येच भव्य दरबार भरवला जातो. पंडित धीरेंद्र शास्त्री दरबारातील कोणालाही नावाने हाक मारतात आणि ती व्यक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचते तेव्हा शास्त्रीजी त्यांचे नाव आणि पत्ता एका कागदावर त्यांच्या समस्या आणि उपायांसह लिहितात. बागेश्वर धाममध्ये केलेला अर्ज कधीच चुकत नाही, अशी लोकांची धारणा आहे.