नवी दिल्ली: गोव्यासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ( Goa Election Result 2022 ) आज सुरु आहे. यंदाही गेल्या वेळेप्रमाणे आमदारांची फोडाफोडी होण्याची शक्यता असल्याने काँग्रेसने दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून २०१७ साली पक्ष बदलून भाजपात गेलेल्या तत्कालीन १० आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी ( Disqualify MLAs who change parties ) करत काँग्रेसच्या गोवा युनिटने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली ( Congress In Supreme Court ) आहे.
2017 मध्ये झालेल्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे सर्वाधिक १७ आमदार निवडून आले होते. तर भाजपचे १३ आमदार होते. त्यानंतर भाजपने आमदारांची फोडाफोडी करत काँग्रेसच्या १० आमदारांना भाजपात दाखल करून घेतले होते.