महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मृत्यूनंतरही अवहेलनाच! जेसीबीच्या सहाय्याने पुरला मृतदेह - जेसीबीच्या सहाय्याने पुरला मृतदेह

कोरोनाच्या संकटात भीषण परिस्थिती उद्भवली आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या मृतदेहाची अवहेलना झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. बिहारमधील पूर्णियात एका कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या मृतदेहाला जेसीबीच्या सहाय्याने पुरण्यात आल्याची घटना घडली आहे.

बिहार न्यूज
बिहार न्यूज

By

Published : May 30, 2021, 8:54 PM IST

पाटणा - देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर असून रुग्णांच्या मृत्यूमध्ये वाढ होताना दिसत आहे. कोरोनाच्या संकटात भीषण परिस्थिती उद्भवली आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या मृतदेहाची अवहेलना झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. बिहारमधील पूर्णियात एका कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या मृतदेहाला जेसीबीच्या सहाय्याने पुरण्यात आल्याची घटना घडली आहे.

पंचू यादव असे मृत रुग्णाचे नाव आहे. पंचू यादव हा बेलगची येथील रहिवासी होता. बेलगची कोरोना केंद्रात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, 29 मेला त्याने प्राण सोडले. त्यांचा मृतदेह नेण्यासाठी प्रशासनाकडून रुग्णवाहिकाही पुरवण्यात आली नाही. सरकारने जारी केलेल्या नियमांचे उल्लघंन करत जेसीबीच्या मदतीने अमूरमधील कालव्याजवळ मृतदेह पुरण्यात आला.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

  • गेल्या 24 तासातील नवे रुग्ण -– 1,65,553
  • गेल्या 24 तासात डिस्चार्ज दिलेले रुग्ण - 2,76,309
  • गेल्या 24 तासांतील मृत्यू – 3,460
  • एकूण रूग्ण -– 2,78,94,800
  • एकूण डिस्चार्ज – 2,54,54,320
  • एकूण मृत्यू – 3,25,972
  • एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 21,14,508
  • गेल्या 24 तासातील लसीकरण संख्या - 30,35,749
  • आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या -– 21,20,66,614
  • गेल्या 24 तासात झालेल्या चाचण्या - 20,63,839
  • एकूण चाचण्यांची आकडेवारी - 34,31,83,748

ABOUT THE AUTHOR

...view details