लखनौ- कानपूरमध्ये एका मुलीसोबत लैंगिक शोषण केल्याप्रकरणी हरिद्वारचे तथाकथित संत प्रखर महाराज ( Case against Swami Prakhar Maharaj in Kanpur ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता प्रखर महाराजांच्या शिष्या संत प्रखर महाराज यांच्या बचावासाठी पुढे आल्या आहेत. या शिष्येने गुरूचा बचाव करताना आपल्याच पालकांवर कट रचल्याचा आरोप केला आहे. चिदानंदमयी यांच्या पालकांनीही प्रखर महाराज यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.
स्वामी प्रखर महाराजांवर ( Swami Prakhar Maharaj controversy ) त्यांच्या शिष्याच्या कुटुंबीयांनी जबरदस्तीने ओलीस ठेवल्याचा आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. हा आरोप प्रखर महाराज यांच्या शिष्येने फेटाळून लावला. स्वत:च्या कुटुंबीयांकडून जीवाला धोका असल्याचे कारण देत शिष्येने प्रशासनाकडे संरक्षणाची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, संन्यास घेण्यापूर्वीच कुटुंबीयांकडून त्यांच्यावर सतत दबाव टाकला ( Swami Prakhar Maharaj in abuse case ) जात होता. संन्यांस सोडून पुन्हा प्रांपचिक जीवनात येण्यासाठी कुटुंबाने आग्रह केला. पण, ती संन्याशाच्या निर्धारावर ठाम राहिली आहे.
कुटुंबीयांवरही मारहाण केल्याचा आरोप- शिष्येने आपल्या कुटुंबीयांवरही मारहाण केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांना व इतर ठिकाणी दिलेली तक्रार पत्रेही त्यांनी दाखविली आहेत. आपलेच कुटुंब गुरु स्वामी प्रखर महाराज यांच्या आश्रमाची मालमत्ता हडप करण्याचा कट रचत असल्याचा आरोपही केला आहे. शिष्येने आपल्या जीवाला धोका असल्याचे कुटुंबीयांना सांगितले आहे. तिच्या सुरक्षेसाठी आणि कुटुंबावर कारवाईची मागणी करत उच्च न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काय होते प्रकरण : यूपी राज्य महिला सदस्या पूनम कपूर यांच्या सांगण्यावरून कानपूरमधील किदवई नगर पोलीस ठाण्यात लैंगिक शोषणाचा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडितेच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. प्रखर महाराज असे या संताचे नाव असून त्यांचा हरिद्वार, उत्तराखंड येथे आश्रम आहे. पूनम कपूर यांनी सांगितले की, ती सखी वन स्टॉप सेंटरमध्ये एका महिलेची तक्रार ऐकत होती. तेव्हा पीडितेची आई आली आणि तिच्यासमोर रडू लागली. ती महिला आणि तिचा पती हे प्रखर महाराजांचे भक्त आहेत. त्यांच्या कार्यक्रमांना ते अनेकदा हरिद्वारला जात असत. महिलेच्या म्हणण्यानुसार, एक-दोनदा ती आपल्या मुलीलाही प्रखर महाराजांच्या कार्यक्रमाला घेऊन गेली होती. तेव्हा प्रखर महाराजांची नजर त्यांच्या मुलीवर पडली.