महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Goa BJP Government Establishment Issue : सत्ता स्थापनेच्या दाव्यावरून गोवा भाजपामध्ये अंतर्गत मतभेद! - माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचा भाजपाला विरोध

भाजपा सरकार स्थापनेच्या दाव्यांमध्ये मतभेद असल्याची माहिती येत आहेत. गोव्यात भाजपाचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी सत्ता स्थापनेसाठी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा पाठिंबा घेतल्याबद्दल पक्षात आपला निषेध नोंदवला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत एमजीपी पक्षाचे दोन आमदार विजयी झाले आहेत. सुदिन ढवळीकर आणि जीत आरोलकर, अशी विजयी आमदारांची नावे आहेत.

माजी मुख्यमंत्री रवी नाईक
माजी मुख्यमंत्री रवी नाईक

By

Published : Mar 11, 2022, 5:31 PM IST

Updated : Mar 15, 2022, 4:54 PM IST

पणजी - गोवा विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असून भाजपा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपाला सर्वाधिक 20 जागा मिळाल्या आहेत. मात्र पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. गोव्यातील बहुमताचा आकडा 21 आहे आणि भाजपाने गोव्यात 20 जागा आपल्या नावी केल्या आहेत. 3 अपक्षांच्या पाठिंब्यानंतर भाजपाने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा पाठिंबा घेतल्याबद्दल माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी पक्षात आपला निषेध नोंदवला आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर गोवा भाजपाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केलेल्या दाव्यानुसार भाजपाला गोव्यात तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपाच्या एकूण जागांनी बहुमताचा टप्पा पार केला आहे. मात्र, भाजपा सरकार स्थापनेच्या दाव्यांमध्ये मतभेद असल्याची माहिती येत आहेत. गोव्यात भाजपाचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी सत्ता स्थापनेसाठी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा पाठिंबा घेतल्याबद्दल पक्षात आपला निषेध नोंदवला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत एमजीपी पक्षाचे दोन आमदार विजयी झाले आहेत. सुदिन ढवळीकर आणि जीत आरोलकर, अशी विजयी आमदारांची नावे आहेत. गोवा निवडणुकीत एमजीपीची तृणमूल काँग्रेससोबत युती होती. गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एमजीपीने भाजपाला पाठिंबा देण्याचे पत्र सादर केले आहे.

गोव्यात भाजपाला सर्वाधिक 20 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 11, आम आदमी पक्षाला 2, गोवा फॉरवर्ड पार्टीला 1, महाराष्ट्रवादी गोमंतक 2, RG पक्षाला 1 आणि अपक्ष उमेदवारांना 3 जागा मिळाल्या आहेत. राज्यात विधानसभेच्या एकूण 40 जागा असून बहुमताचा आकडा 21 आहे. भाजपाला अपक्ष उमेदवारांचा पाठिंबा मिळाल्यास राज्यात पूर्ण बहुमताने सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -Pramod Sawant Swearing Ceremony : नवीन सरकारचा शपथविधी केंद्रीय निरीक्षक ठरवतील - डॉ. प्रमोद सावंत

Last Updated : Mar 15, 2022, 4:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details