महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मिथून चक्रवर्ती यांच्या भाजपा प्रवेशावर दिग्विजय सिंह यांची टीका - मिथून चक्रवर्ती यांचा भाजपा प्रवेशावर दिग्विजय सिंह यांची प्रतिक्रिया

चित्रपट अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्या भाजपाप्रवेशावर माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी टीका केली. चित्रपटातील कलाकार राजकीय पक्षात ये-जा करत असतात, त्यामुळे काहीच फरक पडत नाही, असे ते म्हणाले.

दिग्विजय सिंह
दिग्विजय सिंह

By

Published : Mar 8, 2021, 7:20 AM IST

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी चित्रपट अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्या भाजपाप्रवेशावर टीका केली. अशाप्रकारे चित्रपटातील कलाकार राजकीय पक्षात ये-जा करत असतात, त्यामुळे काहीच फरक पडत नाही, असे ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह एका खासगी कार्यक्रमात भाग घेण्यासाठी इंदूरमध्ये आले होते.

मिथून चक्रवर्ती यांच्या भाजपा प्रवेशावर दिग्विजय सिंह यांची टीका

पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या भारतीय जनता पक्षाने आता युवा मतदारांना आकर्षीत करण्यासाठी चित्रपट अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना पक्षात समाविष्ट केले आहे. काँग्रेस डाव्या आघाडीसह पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवित आहे. आम्हाला अपेक्षेप्रमाणे निकाल मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यापूर्वी अनेक चित्रपट क्षेत्रातील लोकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मात्र, त्यामुळ काहीच फरक पडलेला नाही. चक्रवर्ती आज आले आहेत, ते उद्या निघूनही जातील, असे ते म्हणाले. तसेच भाजपा सरकार चालवत नाही. ते सरकारच्या नावाखाली व्यवसाय करतात. अधिकारी-कर्मचारी ते भाजप नेते आणि मुख्यमंत्री यांच्यापर्यंत प्रत्येकजण कमिशन ठरवतो. ही त्यांची कार्यशैली आहे, असा आरोप त्यांनी केला.

मिथून चक्रवर्ती यांचा भाजपात प्रवेश -

बॉलिवूडमध्ये डिस्को डान्सरच्या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी भाजपात प्रवेश केला आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानावर भव्य रॅली झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये ते भाजपात सामिल झाले. मिथून चक्रवर्ती यांच्या पक्षप्रवेशानंतर भाजपला किती फायदा होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

ABOUT THE AUTHOR

...view details