महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मंड्यांमध्ये जनावरे विकली जातात, तशीच भाजपकडून आमदारांची खरेदी - दिग्विजय सिंह - bjp latest news

राज्यसभेचे खासदार आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दुर्ग येथे पोहचले, त्यांनी माध्यमांशी बोलताना भाजपवर घोडेबाजार केल्याचा आरोप केला आहे. तसेच भाजपकडे काळा पैसा असल्याची, टिका सुद्धा त्यांनी केली.

दिग्विजय सिंह
दिग्विजय सिंह

By

Published : Dec 27, 2020, 4:39 PM IST

रायपूर (छत्तीसगड) - राज्यसभेचे खासदार दिग्विजय सिंह यांनी माध्यमांशी बोलताना भाजपच्या आमदारांवर घोडेबाजाराचा आरोप केला आहे. भाजप सरकारवर निशाणा साधताना ते म्हणाले की, भाजप सरकारकडे काळ्या कमाईचा खूप पैसा आहे. पूर्वी ज्या प्रकारे मंड्यांमध्ये जनावरे विकली जात होती. त्याच प्रकारे आज भाजपा सरकार फार्महाऊस व हॉटेलमध्ये आमदार खरेदी करत असल्याचे दिग्विजय सिंह म्हणाले.

दिग्विजय सिंह छत्तीसगडच्या दौऱ्यावर-

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार दिग्विजय सिंह आज छत्तीसगडच्या दौऱ्यावर आहेत. ते सर्वप्रथम दुर्ग गडावर गेले त्यानंतर पद्मनाभपूर वोरा निवासस्थानी पोहोचले. त्याठीकाणी त्यांनी मोतीलाल वोरा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. राज्यसभेचे खासदार दिग्विजय सिंह यांच्यासह राज्याचे आरोग्यमंत्री टी.एस.सिंगदेव हेदेखील उपस्थित होते.

मोतीलाल वोरा यांच्या आठवणींना उजाळा-

दिग्विजय सिंह म्हणाले की, मोतीलाल वोरा यांच्या सारख्या व्यक्तीला आयुष्यात कधीच पाहिले नाही. त्यांच्या विशाल व्यक्तिमत्त्वाचा एक भाग असा होता की ते ज्याला भेटेत असत त्यांना आत्मीयतेने भेटत होते. तसेत त्या व्यक्तीशी ते नाते निर्माण करत होते. मोठी पदे भूषवल्यानंतरसुद्धा त्यांना थोडासा अहंकार नव्हता. प्रत्येक व्यक्ती, कामगार त्यांना दयाळूपणे भेटत असत.

हेही वाचा-गझनवी फोर्सच्या दहशतवाद्याला काश्मिरातून अटक

ABOUT THE AUTHOR

...view details