नवी दिल्ली:चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाचा कर्णधार एमएस धोनीने ( Captain MS Dhoni ) कर्णधारपद सोडले आहे. तसेच आता या संघाच्या नेतृत्वाची धुरा रवींद्र जडेजाकडे सोपवण्यात आली आहे. यानंतर, माजी क्रिकेटपटू आणि चाहत्यांकडून सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा वर्षाव सुरू झाला असून, संघाचा कर्णधार म्हणून यष्टिरक्षक-फलंदाजा महेंद्र सिंग धोनीच्या योगदान आठवले जात आहे. भारताचा माजी सलामीवीर के. श्रीकांत ( Former opener K. Srikanth ) म्हणाला की, धोनीने एक समृद्ध वारसा सोडला आहे.
त्याने ट्विटरवर लिहिले की, धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. एक लाख वर्षांत हे शक्य आहे असे कधीच वाटले नव्हते! धोनी हा एक उत्तम कर्णधार आहे आणि त्याने आयपीएलमधील सर्वोत्तम संघाचे नेतृत्व करण्याचा वारसा आजपर्यंत सोडला आहे. चेन्नई आयपीएल.
सीएसकेचा माजी खेळाडू सुरेश रैनाने ( Former player Suresh Raina ) देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला जडेजाला संघाची धुरा सांभाळताना पाहून मला आनंद झाला आहे. रैनाने ट्विट केले की, “माझ्या भावासाठी हा क्षण खूप रोमांचित करणारा आहे. त्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे कोणी या फ्रेंचायझीची जबाबदारी पार पाडू शकेल, याचा मी विचारच करू शकत नाही. ज्यामध्ये आम्ही दोघे मोठे झालो होतो. रविंद्र जडेजाला शुभेच्छा. हा एक रोमांचक टप्पा आहे आणि मला खात्री आहे की, यावर तू खरा उतरशील.