अहमदाबाद- गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यात भचाऊ तालुक्यामध्ये धोलावीरा प्रेक्षणीय स्थळ आहे. या प्रेक्षणीय स्थळाचा जागतिक वारसा हक्कात समावेश करण्यात आला आहे.
धोलावीरा हे प्राचीन शहर आहे. या शहराचा 1968 मध्ये शोध लागला आहे. या शहरामध्ये स्मशान व्यवस्था आणि पाणी पुरवठ्याची व्यवस्था होती. शहरात तांबे, दगड आदींच्या कलाकृती, आभूषणे, सोने आणि हस्तीदंत मिळाले आहेत. त्याचबरोबर धोलावीराचे इतर देशांशी व्यापार होते.
हेही वाचा-राज्याला अतिवृष्टीचा १७०० कोटींचा फटका; सहा जिल्ह्यात आठ हजार व्यापाऱ्यांचे नुकसान
युनेस्कोकडून जगभरातील मानवी संस्कृती व परंपरा यांची ओळख व संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. या प्रयत्नाचा भाग म्हणून जागतिक वारशांची यादी जाहीर करण्यात येते.
हेही वाचा-बसवराज बोम्माई यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी निवड
ही आहेत भारतामधील जागतिक वारसास्थळे
आग्रा किल्ला, उत्तर प्रदेश (1983)
जयपूर सिटी, राजस्थान (2019)
अजंठाा, महाराष्ट्र (1983)
सांचीचे बौद्ध स्तूप, मध्य प्रदेश (1989)
चंपानेर-पावागढ पुरातत्व उद्यान, गुजरात (2004)
छत्रपति शिवाजी टर्मिनस, मुंबई, महाराष्ट्र (2004)
गोवा येथील जुने चर्च (1986)
वेरुळ लेणी, महाराष्ट्र (1987)