नवी दिल्ली - धनबाद येथील न्यायाधीशांच्या मृत्यू प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रामणा यांनी सीबीआय आणि इंटेल ब्युरोवर कडक ताशेरे ओढले आहेत. या दोन्ही संस्थांनी न्यायाधीशांच्या संरक्षणासाठी काही केले नसल्याचे सरन्यायाधीश एन. व्ही. रामणा यांनी म्हटले आहे. हे गंभीर विधान आहे. पण, खरे आहे, याची जाणीव असल्याचेही सरन्यायाधीशांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयातील पीठासमोर धनबाद येथील न्यायाधीशांच्या मृत्यूप्रकरणी सू मोटोवर सुनावणी करण्यात आली आहे. यावेळी सुनावणीत सरन्यायाधीश एन. व्ही. रामणा यांनी न्यायाधीशांवरील हल्ल्याबाबत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, की जर हायप्रोफाईल प्रकरण असेल तर न्यायाधीशांना धमकाविणे आणि त्यांचा छळ करणे हा नवा ट्रेण्ड आला आहे. न्यायाधीशांचा मानसिक छळ करण्यासाठी आक्षेपार्ह मेसेजही पाठविण्यात येतात. राज्य सरकारकडून न्यायाधीशांच्या संरक्षणासाठी काहीही करण्यात येत नाही. त्यांच्या निवासस्थानी काही सुरक्षा पुरविणे आवश्यक आहे. न्यायालयात आणि न्यायालयाबाहेरही न्यायाधीशांवर हल्ले झाले आहेत.
हेही वाचा-विरोधी पक्षांनी जंतर-मंतरकडे वळवला मोर्चा; शेतकरी आंदोलनात सहभागी
झारखंड सरकारने मांडली बाजू
झारखंडमध्ये तरुण न्यायाधीशांचा कोळसा माफियांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्याबाबत महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी राज्य सरकारचे अपयश असल्याचे म्हटले आहे. झारखंडच्या अधिवक्त्याने न्यायाधीशांच्या निवासस्थानी सुरक्षा भिंती व अतिरिक्त सुरक्षा आहे. न्यायाधीशांच्या मृत्यूप्रकरणी 22 सदस्यांची एसआयटी स्थापन केली आहे. त्याचदिवशी ऑटोचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची पोलीस चौकशी सुरू आहे.