अमृतसर- सुवर्ण मंदिरात शनिवारी झालेल्या घटनेनंतर मुख्यमंत्री चन्नी यांनी पवित्र तीर्थक्षेत्राला ( Sacrilege Incident in Golden Temple ) भेट दिली. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून खर्या कटकारस्थानाचा पर्दाफाश करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तसेच लोकांना सतर्क राहण्याचे आणि सर्व धार्मिक स्थळे/संस्थांची काळजी घेण्याचे तसेच कायदा आणि सुव्यवस्था, शांतता, सौहार्द आणि बंधुता राखण्यासाठी लोकांना पाठिंबा आणि सहकार्य करण्याचे आवाहन ( CM Charanjit Channi Appeal People ) त्यांनी केले.
पंजाबचे पोलीस महासंचालक सिद्धार्थ चट्टोपाध्याय ( Punjab Director General of Police Siddharth Chattopadhyay Twit ) यांनी ट्विट केले की “मी अमृतसर आणि कपूरथला येथील दुर्दैवी ( Kapurthala Incident ) घटनांची गंभीर दखल घेतली आहे. राज्यातील जातीय सलोखा भंग करण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास ( Law and Order in Punjab ) कडक कारवाई केली जाईल. पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिली. यापूर्वी, अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम 295 (अ), 307 आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेच्या वेळी कर्तव्यावर असलेले सेवादार सधा सिंह यांच्या वक्तव्याच्या आधारे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा यांनी सुवर्ण मंदिरात असभ्यतेच्या प्रकरणी अमृतसर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीनंतर रंधावा म्हणाले की, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. हा तरुण कट करून इथे आला, तो थेट किरण (तलवार) धरायला ( Hold the Kirpan ) गेला.
'आरोपींची ओळख अद्याप पटलेली नाही' -