रांची- रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळावर एका दिव्यांग मुलाला फ्लाइटमध्ये चढू न दिल्याबद्दल ( denying boarding to specially abled child ) डीजीसीएने इंडिगोला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला ( DGCA imposes Rs 5 lakh fine on IndiGo ) आहे. यासोबतच इंडिगोला कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. इंडिगोने 7 मे रोजी रांची विमानतळावर एका दिव्यांग मुलाला फ्लाइटमध्ये चढण्यापासून रोखले होते.
केंद्रीय मंत्र्यांनी डिजीसीएकडून मागविला होता अहवाल- विमानात दिव्यांग मुलाला फ्लाइटमध्ये ( Divyang child viral video ) चढू न दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये मुलाचे पालक नाराज झालेले दिसून आले होते. या प्रकरणाची सोशल मीडियात चर्चा झाल्यानंतर नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया ( Civil Aviation Minister Jyotiraditya Scindia ) यांनी या प्रकरणाची दखल घेतली होती. ट्विटद्वारे म्हटले होते की, 'अशा वृत्तीबाबत शून्य सहनशीलता आहे. असा प्रसंग कोणाच्याही वाट्याला येऊ नये. मी स्वतः या प्रकरणाची चौकशी करत आहे. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने ( DGCA Report ) इंडिगोकडूनही या प्रकरणी अहवाल मागवला होता.
काय आहे नेमके प्रकरण-बोकारो येथील एका कुटुंबाला हैदराबादला जायचे होते. त्यासाठी ते बोकारोहून रांचीला पोहोचले. त्या वेळी त्याचे दिव्यांग मूल थोडे घाबरून सतत रडत होते. त्यानंतर मुलाला इंडिगोच्या रांची-हैदराबाद फ्लाइटमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. यादरम्यान मुलाच्या पालकांनी एअरलाइन्स कर्मचाऱ्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी कसलीही सहानुभूती दाखविली नाही. एवढेच नाही तर यावेळी तेथे उपस्थित असलेल्या प्रवाशांनी विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांना प्रवासाची परवानगी देण्याचे आवाहनही केले, मात्र विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मुलाला विमानात चढू दिले नाही. यानंतर पालकही फ्लाइटमध्ये चढले नाहीत.