महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

डीजीसीएचा तृतियपंथीय पायलटना हिरवा कंदिल मार्गदर्शक तत्त्वांनुसार विमान उडवण्याची परवानगी - मार्गदर्शक तत्त्वांनुसार विमान उडवण्याची परवानगी

डीजीसीएने बुधवारी तृतियपंथीयांसाठी पायलट होण्याकरता मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. त्यामध्ये म्हटले आहे की ट्रान्सजेंडर अर्जदाराच्या कार्यक्षमतेचे आणि क्षमतेच्या जोखमीचे मूल्यांकन केले जाईल. त्यामध्ये त्यांचा फिटनेस पाहिला जाईल. तसेच त्याचे मूल्यांकन केले जाईल. जर नियमानुसार ते त्यांचा फिटनेस असेल तर त्यांना नियुक्ती देण्यात येईल.

डीजीसीएचा तृतियपंथीय पायलटना हिरवा कंदिल
डीजीसीएचा तृतियपंथीय पायलटना हिरवा कंदिल

By

Published : Aug 11, 2022, 10:09 AM IST

नवी दिल्ली: व्यावसायिक पायलट परवान्यासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या ट्रान्सजेंडर अर्थात तृतियपंथीय व्यक्तींचा मार्ग काहीसा सोपा झाला आहे. अशा लोकांच्या फिटनेसचे मूल्यांकन करण्यासाठी हवाई वाहतूक क्षेत्र नियामक DGCA ने बुधवारी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) गेल्या महिन्यात अॅडम हॅरी (केरळमधील ट्रान्सजेंडर पुरुष) यांना व्यावसायिक पायलट परवाना देण्यास नियामकाने नकार दिल्याचा दावा करणाऱ्या मीडिया वृत्तांचे खंडन केले होते.

यासंदर्भातील बातम्या चुकीच्या आहेत असे डीजीसीएने म्हटले आहे. तेव्हा म्हटले असे होते की ट्रान्सजेंडर व्यक्तीला फिटनेसचे वैद्यकीय प्रमाणपत्र जारी केले जाऊ शकते. जर त्यांना कोणताही वैद्यकीय, मानसिक किंवा मानसिक आजार नसेल, तर असे कले जाऊ शकते. डीजीसीएने बुधवारी आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे की ट्रान्सजेंडर अर्जदाराच्या कार्यक्षमतेचे आणि क्षमतेचे मूल्यांकन करण्याच्या तत्त्वांचे पालन करून त्यांच्या फिटनेसचे मूल्यांकन केले जाईल.

यामध्ये नमूद करण्यात आले आहे की, अशा ट्रान्सजेंडर अर्जदार, जे हार्मोन थेरपी घेत आहेत किंवा गेल्या पाच वर्षांपासून लिंग बदलाची शस्त्रक्रिया करत आहेत, त्यांच्या मानसिक आरोग्याची स्थिती तपासली जाईल.

हेही वाचा - 2 Pakistani arrested डेरा बाबा नानक येथे भारत पाकिस्तान सीमेवरून 2 पाकिस्तानी नागरिकांना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details