कुर्नूलकोंडाळा रायडू मंदिरात Kondala Rayudu Temple एक विचित्र परंपरा पाळली जाते. ज्यामध्ये देवतेला प्रसन्न करण्यासाठी भक्त विंचू अर्पण करतात. हे मंदिर आंध्र प्रदेशातील Andhrapradesh कुरनूल जिल्ह्यातील कोडुमुरू येथे डोंगराच्या शिखरावर आहे. दर श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी, विशेष परंपरा साजरी करण्यासाठी दूर दूरच्या जिल्ह्यांतून भाविक मंदिरात येतात.
वर्षानुवर्षे जुनी परंपरा मंदिरांमध्ये देव आणि देवतांना नैवेद्य म्हणून लोक मिठाई, फळे, फुले किंवा पैसेही अर्पण करतात असे सामान्यत पाहिले जाते. तथापि, कर्नूल जिल्ह्यातील कोडुमुरू गावात असलेल्या एका मंदिरात, भक्त भगवान कोंडाला रायडूला जिवंत विंचू अर्पण करतात. भारत हा विविध संस्कृती, परंपरा आणि संस्कारांनी भरलेला देश आहे आणि लोक भक्तीच्या नावाखाली विलक्षण प्रथा पार पाडताना दिसतात.देवाला विंचू अर्पण करणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. ते डोंगरमाथ्यावर दगडाखाली विंचू शोधतात आणि त्यांना बिनदिक्कत हातात धरतात. ही वर्षानुवर्षे जुनी आहे आणि आजही तितक्याच उत्साहात साजरी केली जाते.