महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Devotees Drowned In Chambal : करौली देवीच्या दर्शनासाठी गेलेले 18 भाविक चंबळमध्ये बुडाले - करौली देवीच्या दर्शनासाठी गेलेले भाविक बुडाले

मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या सीमेवर चंबळ नदीत देवीच्या दर्शनासाठी जाणारे भाविक बुडाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी पाणबुड्यांच्या मदतीने एका महिलेसह ३ जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.

Devotees Drowned In Chambal
18 भाविक चंबळमध्ये बुडाले

By

Published : Mar 18, 2023, 12:51 PM IST

मुरैना/करौली (मध्य प्रदेश) : उत्तर भारतातील प्रसिद्ध कैलादेवी लक्की मेळा सुरू होण्यापूर्वीच एक दुःखद बातमी समोर आली आहे. शनिवारी मध्यप्रदेशातून कैलादेवीकडे पायी येणाऱ्या 17 प्रवाशांचा समूह मंद्रयालच्या चंबळ नदीत वाहून गेला. मुरैनाचे जिल्हाधिकारी अंकित अस्थाना यांनी तीन मृतदेह सापडल्याची पुष्टी केली आहे. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

11 जण वाचले : गावकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील 17 जणांचा समूह कैलादेवीच्या यात्रेसाठी येत होता. करौली जिल्ह्यातील मंद्रायल उपविभागातून जाणाऱ्या चंबळच्या रोहाई घाटावर पादचाऱ्यांचा हा गट पाण्यातून जात होता. त्यावेळी आलेल्या पाण्याचा जोरदार प्रवाहामुळे पाय घसरून सर्व पादचारी चंबळ नदीत वाहून गेले. पादचाऱ्यांच्या आरडाओरडानंतर आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनास्थळ गाठून दहा महिला व पुरुष पादचाऱ्यांना तात्काळ बाहेर काढले. मात्र 7 पादचारी सध्या बेपत्ता आहेत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आली आहे.

मदत आणि बचावकार्य सुरू :घटनेची माहिती मिळताच करौलीचे जिल्हाधिकारी अंकित कुमार सिंह, एसपी नारायण टोंकस यांच्यासह पोलीस प्रशासन आणि एसडीआरएफचे जवानही घटनास्थळी पोहोचले आहेत. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे. दरवर्षी चैत्र नवरात्रीच्या आधी करौली येथील प्रसिद्ध मंदिर कैला देवी येथे लक्खी मेळा भरतो. यामध्ये संपूर्ण राजस्थान, मध्य प्रदेश आणि इतर राज्यातूनही भाविक पोहोचतात. यामध्ये पादचाऱ्यांची संख्याही मोठी आहे. यंदा ही जत्रा 19 मार्च, रविवारपासून सुरू होत आहे. त्यासाठी यात्रेकरूंनी कैलादेवी गाठायला सुरुवात केली आहे.

अरुणाचल प्रदेशात लष्करी हेलिकॉप्टर कोसळले : गुरुवारी सकाळी अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यात भारतीय सैन्यदलाचे हेलिकॉप्टर कोसळले. सकाळी ९.१५ च्या सुमारास हेलिकॉप्टरचा रडारशी संपर्क तुटला. त्यानंतर काही वेळाने मंडाळा येथून धुराचे लोट उठलेले दिसले. भारतीय लष्कराच्या शोध पथकाने घटनास्थळाची पाहणी केली आहे. या अपघातात लष्कराच्या दोन वैमानिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा :Col VVB Reddy : हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कर्नल रेड्डी यांना हैदराबाद विमानतळावर श्रद्धांजली, आज मूळ गावी अंत्यसंस्कार

ABOUT THE AUTHOR

...view details