वाराणशी - श्रावण सोमवारानिमित्त काशी विश्वनाथ मंदिरात भाविकांनी गर्दी केली. सकाळी मंगल आरती झाल्यानंतर मंदिर हे भक्तांसाठी खुले करण्यात आले. कोरोनाच्या काळातील नियमाप्रमाणे भाविकांना गाभाऱ्यात जाण्यास मनाई आहे. भक्त हे मंदिराबाहेर जल आणि दूध अर्पण करत आहेत.
विश्वनाथ मंदिरात पहाटे 3 वाजता आरती झाली. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. रविवारीही मंदिरात भाविकांची गर्दी दिसून आली होती. सुरक्षेच्या दृष्टीने मंदिराबाहेर सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहे. मंदिरात येणारे अनेक रस्ते बंद करण्यात आले आहे.
हेही वाचा-आरक्षणाबाबतच्या दुरुस्ती विधेयकाला विरोधक पाठिंबा देणार - मल्लिकार्जुन खरगे