महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ह्रदयद्रावक! बंगळुरूमध्ये स्मशानभूमीच्या बाहेर लागले 'हाऊस फुल'चे फलक - बंगळुरू स्मशानभूमी समस्या न्यूज

दिवसभरात तेथील कर्मचाऱ्यांना 45 मृतदेहांवर अंतिमसंस्कार करणे शक्य नव्हते. त्यामुळे स्मशानभूमीच्या बाहेर 'हाऊस फुल'चा बोर्ड लावण्यात आला. यावेळी मृतांच्या नातेवाईकांची धावाधाव होताना दिसून आली.

crematorium puts by House Full board
हाऊस फुलचे बोर्ड

By

Published : May 3, 2021, 4:42 PM IST

Updated : May 3, 2021, 4:48 PM IST

बंगळुरू - कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने बंगळुरूमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना वेगळ्याच संकटाला सामोरे जावे लागत आहे. स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा नसल्याने 'हाऊस फुल'चे बोर्ड लावण्यात आले आहेत.

बंगळुरूमधील चमराजपेट येथे टीआर मिल स्मशानभूमी आहे. या ठिकाणी 45 मृतदेह आणण्यात आले. मात्र, एकाचवेळी 20 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे शक्य आहे. तर 19 मृतदेहांवर अंतिमसंस्कार करण्यासाठी आधीच नोंदणी झाली होती. दिवसभरात तेथील कर्मचाऱ्यांना 45 मृतदेहांवर अंतिमसंस्कार करणे शक्य नव्हते. त्यामुळे स्मशानभूमीच्या बाहेर 'हाऊस फुल'चा बोर्ड लावण्यात आला. यावेळी मृतांच्या नातेवाईकांची धावाधाव होताना दिसून आली.

स्मशानभूमीच्या बाहेर लागले 'हाऊस बोर्ड'चे फलक

हेही वाचा-संगमनेरमधील नव्वदीतील आजी-आजोबांची कोरोनावर मात

स्मशानभूमीबाहेर रुग्णवाहिकांच्या रांगा-

अनेक स्मशानभूमीच्या बाहेर रुग्णवाहिकांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या आहेत. पीन्या येथील एसआरएस स्मशानभूमीच्या बाहेर 11 रुग्णवाहिकांच्या रांगा लागल्या होत्या. मृतदेहांवर अंतिमसंस्कार करण्यासाठी मृतांच्या नातेवाईकांना काही तास वाट पाहावी लागली. स्मशानभूमीची व्यवस्था पाहणाऱ्या कर्मचाऱ्याने दररोज साधारणत: 40 मृतदेह अंतिमसंस्कारासाठी आणले जात असल्याचे सांगितले.

हेही वाचा-कोरोनाबाधितांचे प्रमाण चार ते सहा आठवड्यांत कमी होईल-आयसीएमआर वैज्ञानिक

दरम्यान, दिल्लीमध्ये कोरोनाबाधितांच्या मृतदेहांवर स्मशानभूमीत अंतिमसंस्कार केलेले फोटो आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही छापले होते.

Last Updated : May 3, 2021, 4:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details