नवी दिल्ली/पणजी- गोवा विधानसभा निवडणूक अवघ्या पाच महिन्यांवर येऊन ठेपली असताना राजकीय हालचालींना वेग आला आहे. गोवा राज्याचे भाजप निवडणूक प्रभारी तथा महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत गोवा विधानसभा निवडणुकीबाबत शाह यांच्याकडून मार्गदर्शन घेतल्याचे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीबाबतचे ट्विट गोवा राज्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की आमचे नेते अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी थोडक्यात माहिती दिली. गोवा विधानसभा निवडणुकीबाबत मार्गदर्शन घेतले आहे. अमित शाह यांनी महाराष्ट्रातील पावसाची आणि विशेषत: मराठवाड्यातील पुरस्थितीची सविस्त माहिती जाणून घेतली. यावेळी गोव्याचे मंत्री मायकेल लोबोदेखील उपस्थित होते.
हेही वाचा-परीक्षा वारंवार रद्द होण्याबाबत सरकारने गंभीरपणे विचार करावा, अन्यथा..फडणवीस यांचा इशारा
देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी भाजपचे राष्ट्रीय जे. पी. नड्डा यांची भेट घेतली होती. या भेटीत विविध विषयांसह गोवा विधानसभा निवडणुकीबाबत मार्गदर्शन घेतल्याचे भाजप नेते फडणवीस यांनी ट्विट केले होते.
हेही वाचा-देवेंद्र फडणवीस आजपासून गोवा दौऱ्यावर; काँग्रेस, आप नेतेही लागले निवडणूक तयारीला