नवी दिल्लीभाजपने पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या सदस्यांची यादी जाहीर केली. या समितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy CM Devendra Fadnavis यांचा समावेश BJP Central Election Committee आहे. दुसरीकडे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना या समितीमधून वगळले आहे.
भाजपने आपली संसदीय मंडळआणि केंद्रीय निवडणूक समिती जाहीर केली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना संसदीय मंडळातून वगळण्यात आले आहे. जेपी नड्डा हे या संसदीय मंडळाचे आणि भाजपच्या निवडणूक समितीचे अध्यक्ष असतील. सर्बानंद सोनोवाल आणि बीएस येडियुरप्पा यांचा भाजपच्या बोर्डात समावेश करण्यात आला आहे. संसदीय मंडळ ही भाजपची सर्वात शक्तिशाली संस्था आहे. पक्षाचे सर्व मोठे निर्णय या मंडळाच्या माध्यमातून घेतले जातात.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांना संसदीय मंडळात स्थान मिळाले नाही, परंतु त्यांना निवडणूक समितीचे सदस्य बनवण्यात आले आहे. त्यांच्याशिवाय वनमंत्री भूपेंद्र यादव आणि मूळचे राजस्थानचे असलेले ओम माथूर यांनाही या निवडणूक समितीमध्ये स्थान देण्यात आले आहे.
भाजप संसदीय मंडळाची संपूर्ण यादी