जोधपुर - येत्या काळात चीन आक्रमक असेल तर आम्हीसुद्धा तितकेच तयार आहोत, असे हवाई दलाचे प्रमुख आर. के. एस भदौरिया म्हणाले आहेत. भारत आणि फ्रान्स यांच्यात सुरू असलेल्या ‘डेझर्ट नाईट -21’ च्या औपचारिक समारोपासाठी भारतीय हवाई दलाचे प्रमुख भदौरिया जोधपूरला पोहचले. यावेळी ते बोलत होते.
भारत आणि फ्रान्स दरम्यानच्या युद्ध अभ्यासात दोन्ही बाजूंच्या लढाऊ विमानांनी भाग घेतला. हा युद्धअभ्यास लहान होता. मात्र, बरेच काही शिकण्यासारखे होते, असे भदौरीया म्हणाले. संयुक्त युद्धअभ्यास हा कुणाच्या विरोधात नसतो. सध्या आपल्याकडे 8 राफेल आहेत. या महिन्याच्या अखेरीस आणखी 3 राफेल भारतात येतील. भारतीय पायलटचे फ्रान्समध्ये प्रशिक्षण सुरू आहे. भारतातही आम्ही वेगवेगळ्या बॅच बनवून प्रशिक्षण देत आहोत, असे त्यांनी सांगितले.