रोहतक ( हरियाणा ): Gurmeet Ram Rahim: डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमला पुन्हा एकदा ४० दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला gurmeet ram rahim get 40 days parole आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरमीत राम रहीमला ४० दिवसांचा पॅरोल मिळाला आहे. गुरमीत राम रहीमला राजस्थानमधील आश्रमात नेले जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.
Gurmeet Ram Rahim: बाबा राम रहीमला ४० दिवसांचा पॅरोल.. राजस्थानातील आश्रमात जाण्याची शक्यता - डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम
Gurmeet Ram Rahim: डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमला पुन्हा एकदा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरमीत राम रहीमला ४० दिवसांचा पॅरोल मिळाला gurmeet ram rahim get 40 days parole आहे. गुरमीत राम रहीमला राजस्थानमधील आश्रमात नेले जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.
या गुन्ह्यात आरोपींना शिक्षा :सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बाबा राम रहीमसहित पाच आरोपींना ऑक्टोबर 2021 जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने राम रहीमला 31 लाखांचा दंड ठोठावला आहे. तर इतर आरोपींना 50 हजारांचा दंड ठोठावला आहे. रणजीत सिंह हत्याकांडात डेराचे प्रमुख गुरमीत रहीम सिंह आणि कृष्ण कुमारला न्यायालयाने खून आणि कट रचण्याच्या गुन्ह्यात दोषी ठरविले आहे. तर जसवील आणि सबदिल यांना खून, कट रचणे आणि शस्त्र बाळगणे या गुन्ह्यात न्यायालयाने दोषी ठरविले आहे.
या गुन्ह्यांत बाबा रहीम आहे तुरुंगात कैद:रोहतकच्या तुरुंगामधून बाबा राम रहीमची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजेरी झाली. यापूर्वी बाबा रहीमला दोन महिला साध्वीवरील बलात्कार प्रकरणी ऑगस्ट २०१७ मध्ये त्याला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. या दोन्ही प्रकरणात रहीम हा रोहतक येथील सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत आहे. तसेच पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याप्रकरणी दोषी ठरलेल्या गुरमीत राम रहीम याला विशेष सीबीआय न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या हत्येनंतर तब्बल १६ वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला होता.