महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जगातील दुसऱ्या सर्वात उंच पर्वतरांगेवर पहिल्यांदाच महिला संरक्षक तैनात; नंदादेवी राष्ट्रीय उद्यानाचा निर्णय - world second highest mountain peak nanda devi

नंदादेवी पर्वतरांग ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच पर्वतरांग मानली जाते. याठिकाणची बिकट भौगोलिक परिस्थिती पाहता आतापर्यंत केवळ पुरुषांनाच संधी दिली जात होती. मात्र, येथील प्रभारी संचालक अमित कंवर यांनी पहिल्यांदाच महिलांवर ही जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला होता.

deployment-of-women-soldiers-for-the-first-time-on-peaks-of-nanda-devi
नंदादेवी राष्ट्रीय उद्यानात पहिल्यांदाच महिला वन संरक्षक तैनात

By

Published : Jun 15, 2021, 4:31 PM IST

चमोली : उत्तराखंडमध्ये स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीने पाऊल टाकत एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. नंदादेवी बायोस्फिअर रिजर्वमध्ये आतापर्यंत केवळ पुरुष वनरक्षकांना तैनात करण्यात येत होते. यावेळी पहिल्यांदाच प्रशासनाने या भागात वन्य जीवांची सुरक्षा आणि देखरेख करण्यासाठी तीन महिलांना तैनात करण्यात आले आहे.

नंदादेवी पर्वतरांग ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच पर्वतरांग मानली जाते. याठिकाणची बिकट भौगोलिक परिस्थिती पाहता आतापर्यंत केवळ पुरुषांनाच संधी दिली जात होती. मात्र, येथील प्रभारी संचालक अमित कंवर यांनी पहिल्यांदाच महिलांवर ही जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला होता.

नंदादेवी राष्ट्रीय उद्यानात पहिल्यांदाच महिला वन संरक्षक तैनात

अमित कंवर यांनी सांगितले, की जूनच्या पहिल्या आठवड्यात नंदादेवी राष्ट्रीय उद्यानाची तीन पथके वेगवेगळ्या वनक्षेत्रांमध्ये गस्त घालून आली. यामध्ये त्यांनी दुर्मिळ प्राणी, औषधी वनस्पतींची तस्करी, शिकार, झाडांची अवैध कत्तल आणि अतिक्रमण अशा घटनांवर लक्ष ठेवण्याची कामगिरी पार पाडली. अमित कंवर यांनी निर्देश दिल्यानंतर रेंज अधिकारी चेतना कांडपाल यांनी महिला वन पोलीस आणि वन संरक्षकाला दूरच्या गस्तीसाठी प्रशिक्षण दिले होते.

या गस्तीदरम्यान सर्वांनी सुमारे ६० किलोमीटरचे अंतर पायी चालत पार पाडले. यामध्ये वन पोलीस ममता कनवासी, दुर्गा सती आणि वन संरक्षक रोशनी यांचा समावेश होता. १२ जणांच्या पथकामध्ये पहिल्यांदाच तीन महिलांचा समावेश करण्यात आला होता.

हेही वाचा :देशात एम्सच्या डॉक्टरांचे कोविड विरोधात बूस्टर डोसवर संशोधन सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details