नवी दिल्ली -रक्षाबंधन ( RakshaBandhan ) सण जवळ आला आहे. बहिण-भावातील प्रेमाच्या नात्याला राखी ने घट्ट बांधणारा रक्षाबंधन सण आहे. सणासाठी दूर-दूरच्या ठिकाणी राख्या पाठवण्यासाठी टपाल खात्याने खास राखी लिफाफे आणले आहेत ( Department of Posts launches exclusive Rakhi envelopes ), अशी माहिती दळणवळण मंत्रालयाने ( Ministry of Communications ) गुरुवारी दिली. यावर्षी 11 ऑगस्ट रोजी हा रक्षाबंधन सण साजरा होत आहे.
टपाल खात्याचे खास राखी लिफाफे - "रक्षाबंधनाच्या निमित्ताने, टपाल खात्याने खास राखी लिफाफे आणले आहेत. दिल्ली पोस्टल सर्कलने यात उत्कृष्ट कला दाखवली असून ते जलरोधक ( Waterproof ), हलके वजन ( Light Weight )असलेले आणि उच्च दर्जाचे ( high quality ) राखी लिफाफे आहेत. विषेश म्हणजे त्यांच्या विक्रीसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. दिल्ली शहर पोस्ट ऑफिसेसद्वारे हे मोहक आणि आकर्षक लिफाफे तयार करण्यात आले आहेत,” असे दळणवळण मंत्रालयाने म्हटले आहे.