सहारनपूर : प्रेषित मोहम्मद साहेबांवर भाजप नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सुरू झालेली चर्चा थांबण्याचे नाव घेत नाही. या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप हायकमांडने प्रवक्त्या नुपूर शर्मा यांची हकालपट्टी केली आहे. त्याचबरोबर देवबंदी उलेमांनी नुपूर शर्माला फाशी देण्याची मागणी केली आहे. इत्तेहाद उलेमा-ए-हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देवबंदी उलेमा मौलाना कारी मुस्तफा देहलवी यांनी नुपूर शर्मा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. ते म्हणाले की आपण सर्व काही सहन करू शकतो, परंतु अल्लाह वरील टीका कोणत्याही किंमतीत सहन करू शकत नाहीत.
ते म्हणाले की, नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल ज्यांनी अल्लाह बाबत बोलताना गलिच्छपणा केला आहे. यासाठी आम्ही आमच्या 56 इंच छातीचे पंतप्रधान मोदी आणि भारत सरकार यांच्याकडे मागणी करतो की त्यांना त्वरित त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. कारण, संपूर्ण जगात भारत आणि इथे राहणारे लोक कलंकित झाले आहेत. यामुळे भारताचे मोठे नुकसान झाले आहे.