नवी दिल्ली Dense Fog In Delhi : उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. त्यामुळं दाट धुकं पसरल्यानं रेल्वे आणि विमान सेवेला त्याचा जोरदार फटका बसला आहे. बुधवारी सकाळी धुक्यामुळं रेल्वे सेवा आणि विमान सेवेला जोरदार फटका बसला. त्यामुळं 178 विमान उड्डाणं प्रभावीत झाले आहेत. त्यातील 120 विमानं उशीरानं उड्डाण करत आहेत. तर रेल्वे सेवाही विस्कळीत झाली आहे.
173 विमान उड्डाणांवर परिणाम :उत्तर भारतात सध्या धुक्याची दाट चादर पसरली आहे. त्यामुळं दृश्यमानता कमी झाली आहे. सध्या उत्तर भारतात पसरलेल्या दाट धुक्यामुळं 173 विमान उड्डाणं प्रभावित झाले आहेत. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण करणाऱ्या आणि दिल्लीत इतर शहरातून येणाऱ्या विमानांनाही फटका बसला आहे. दाट धुक्यामुळं आतापर्यंत 53 विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. यातील 21 विमानं दिल्लीत येणारी होती. तर 16 विमानं दिल्लीतून इतर शहरांसाठी उड्डाण करणार होती.
तीस तास झाला प्रवाशाला उशीर :धुक्यामुळं विमानप्रवास चांगलाच प्रभावित झाला आहे. दुबईवरुन इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या मृत्यूंजय कुमार यांनी त्यांची आपबीती कथन केली. ते म्हणाले "मला तातडीनं दिल्लीला यावं लागलं, परंतु दाट धुक्यामुळं इथं यायला 30 तास लागले. अगोदर मी स्पाईसजेटची फ्लाईट घेतली, ती रिशेड्यूल्ड झाल्यानं 24 तास उशीर झाला. त्यामुळं मी एयर इंडिया फ्लाइट बुक केली. मात्र त्यांनाही दोन ते तीन तास उशीर झाला."
गाड्या सहा ते सात तास उशीरा :देशाच्या राजधानीत येणाऱ्या रेल्वे गाड्य़ांनाही दाट धुक्याचा मोठा फटका बसला आहे. विविध राज्यातून दिल्लीत येणाऱ्या 20 गाड्या साडेसहा तास उशीरानं धावत आहेत. त्यामुळं दिल्लीत येणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत असल्याचं दिसून येत आहे. तर दुसरीकडं दिल्लीतून परत जाणाऱ्या रेल्वे गाड्याही उशीरानं परत जात आहेत. सध्या 20 रेल्वे गाड्या एक ते साडेसहा तास उशीरानं धावत आहेत, अशी माहिती रेल्वे विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे.
हेही वाचा :
- मुंबई विमानतळावर विमाने उभी करण्याच्या जागीच बसून जेवण; इंडिगोसह मुंबई विमानतळ प्रशासनाला नोटीस, कंपनीनं मागितली माफी
- फ्लाइटला उशीर झाल्यास प्रवाशांना 'व्हॉट्सअॅप'वर मिळणार अपडेट, इंडिगोतील घटनेनंतर DGCA ने जारी केली SOP
- दाट धुक्याचा विमानसेवा, रेल्वेला फटका; 17 विमान रद्द, रेल्वेसेवा विस्कळीत