केजरीवालांच्या निवास्थानाबाहेर पुजार्यांचे निदर्शने नवी दिल्ली :दिल्लीत मंदिरांच्या पुजाऱ्यांनी पगार वाढीची मागणी लावून धरून राजकारण तापवले आहे. सनातन धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि पगाराच्या मागणीसाठी मंदिरातील पुजारी मोठ्या संख्येने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले. पुजाऱ्यांचे म्हणणे आहे की, दिल्ली सरकार हिंदूंना सावत्र आईची वागणूक देत आहे, त्यामुळे सर्व लोक एकवटले आहेत. ते म्हणाले की, देशातील हिंदूंच्या करातून मौलवी आणि मौलानाना पगार मिळू शकतो, मग मंदिरात काम करणाऱ्या पुजाऱ्यांना पगार का दिला जाऊ शकत नाही असा प्रतिप्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा इशारा : पुजारी सेलचे अध्यक्ष कर्नैल सिंह म्हणाले की, दिल्ली सरकार हिंदू पुजार्यांशी गैरवर्तन करत आहे. येत्या विधानसभेत सनातन धर्माचे वर्चस्व राहणार आहे. दुसरीकडे, अयोध्या हनुमान गढी येथून सनातन धर्माचा आवाज बुलंद करण्यासाठी मंचावर पोहोचलेले महंत जगदीश दास म्हणाले की, तिरुपती बालाजी आणि माता वैष्णोदेवीच्या निधीतून मौलवींना पगार दिला जात आहे. ते म्हणाले की, आज हजारो लोक दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्यासाठी पोहोचले आहेत. सरकारने सनातन्यांची मागणी मान्य न केल्यास येत्या काळात लाखो लोक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाचा घेराव घालतील असा इशाराही त्यांनी दिला आहे.
आंदोलनात मोठ्या प्रमाणात साधूंची उपस्थिती हिंदूंच्या कराचा पैसा मशिदींच्या मौलवींना : मुख्यमंत्र्यांवर फसवणूक केल्याचा आरोप करत ते म्हणाले की, जो व्यक्ती आपल्या गुरूला फसवू शकतो, तो हिंदू समाज आणि मंदिरात काम करणाऱ्या पुजाऱ्यांना लोक काय महत्त्व देणार. दिल्ली साधू समाजाचे अध्यक्ष महंत नवल किशोर म्हणाले की, केजरीवाल सरकार हिंदूंना कमकुवत मानत आहे. साधू-महात्मा कधीच सरकारवर अवलंबून नसतात. ते देवावर अवलंबून असतात. हिंदूंच्या कराचा पैसा मशिदींच्या मौलवींना दिला जात आहे.
मौलवींना पगार तर आम्हालाही पगार द्या अशी मागणी साधू समाजातील लोकांना पगार नाही : विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी आलेल्या साधू समाजाच्या लोकांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, मौलाना आणि मौलवींसाठी पगार जितका महत्त्वाचा आहे तितकाच मंदिरात काम करणाऱ्या पुजारी आणि संतांनाही आहे. ऋषी-मुनींनाही पोट असते, ते हक्क मागण्यासाठी आंदोलनही करू शकतात. जोपर्यंत दिल्ली सरकार मौलाना आणि मौलवी तसेच साधू समाजातील लोकांना पगार देत नाही, तोपर्यंत साधू समाजाच्या लोकांना रस्त्यावर येऊन सरकारचा निषेध करण्यास भाग पाडले जाईल, असे ते म्हणाले.
हेही वाचा :भारतात हिंदू सुरक्षित नाहीत; प्रवीण तोगडिया यांचे वादग्रस्त विधान