महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सीएए, एनआरसी विरोधी आंदोलनाची लाट; वर्षभरापूर्वी दिल्लीत होता चक्का जाम - दिल्ली राष्ट्रीय लोकसंख्या नोदंणी

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरित्व नोंदणी विरोधात राजधानी दिल्लीत मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू होते. या आंदोलनास आता एक वर्ष पूर्ण झाले आहे.

सीएए आंदोलन
सीएए आंदोलन

By

Published : Dec 15, 2020, 4:26 PM IST

नवी दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरित्व नोंदणी विरोधात राजधानी दिल्लीत आज वर्षापूर्वी आंदोलन सुरू होते. या आंदोलनास आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. दिल्लीतील शाहीन बाग परिसरात आंदोलकांनी ठिय्या मांडला होता. सोबतच जामिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनीही लढा उभारला होता. मात्र, देशभरात कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर २४ मार्चला आंदोलन गुंडाळण्यात आले होते.

ईशान्य दिल्लीत झाली होती दंगल

दिल्लीतील आंदोलन

संसदेत सीएए कायदा मंजूर झाल्यानंतर १५ डिसेंबर २०१९ ला दिल्लीत आंदोलन सुरू झाले होते. मुस्लिम नागरिकांनी विशेषत: आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. यासोबतच देशातील विविध राज्यांत आंदोलनाचे लोन पसरले होते. हे आंदोलन एकीकडे जोर धरत असतानाच ईशान्य दिल्लीत दंगली उसळली होती. या दंगलीत ५० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर अनेक घरांची जाळपोळ झाली होती. या दंगलीचा तपास अद्यापही सुरू आहे.

दिल्लीतून नोयडा, फरिदाबादकडे जाणार रस्ता जाम

सीएए-एनआरसी विरोधी आंदोलनामुळे दिल्लीतून नोयडा, फरिदाबादकडे जाणार रस्ता बंद झाला होता. त्यामुळे राष्ट्रीय राजधानी परिसर म्हणजेच उपनगरीय भागात राहणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल झाले होते. आंदोलकांनी रस्त्यावरच अनेक दिवस ठिय्या मांडला होता. मोठ्या प्रमाणात महिलांनी आंदोलनात सहभाग घेतला असल्याने यास महिलांची चळवळ असेही संबोधले जात होते. सर्वोच्च न्यायालयाने आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी मध्यस्थी मंडळाची निर्मिती केली होती.

नागरिकत्व दुरुस्ती कायदाअंतर्गत काही ठराविक धर्माच्या नागरिकांना भारतात आश्रय देण्यात येतो. पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तान अल्पसंख्य असलेल्या नागरिकांना भारतात येण्याचा मार्ग याद्वारे मोकळा झाला आहे. मात्र, काही ठराविक धर्मांचा समावेशच करण्यात आल्यामुळे आंदोलन छेडण्यात आले होते. पाकिस्तान आणि बांगलादेश हे मुस्लीम बहुल देश असल्यामुळे मुस्लीमांचा या यादीत समावेश नव्हता. त्यास अनेकांनी आक्षेप घेतला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details