महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Special Interview : जुने मंदिर किंवा मशीद पाडणे हे भारतीय स्मारक कायद्याच्या विरोधात - इरफान हबीब - ज्ञानवापी मशीद इरफान हबीब प्रतिक्रिया

प्रख्यात इतिहासकार इरफान हबीब ( Irfan Habib on Gyanvapi mosque ) यांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत मुघल सम्राट औरंगजेबाने वाराणसी आणि मथुरा येथील मंदिरांना नष्ट केल्याबद्दलचे तथ्ये मांडण्याचा प्रयत्न केला.

Irfan Habib on Gyanvapi mosque
इरफान हबीब

By

Published : May 23, 2022, 2:29 PM IST

अलिगड (उ.प्र) - प्रख्यात इतिहासकार इरफान हबीब यांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत मुघल सम्राट औरंगजेबाने वाराणसी आणि मथुरा येथील मंदिरांना नष्ट केल्याबद्दलचे तथ्य मांडण्याचा प्रयत्न केला. वाराणसी येथील मंदिरांच्या विध्वंसाबद्दल इरफान हबीब म्हणाले, औरंगजेबाने मंदिरे उद्ध्वस्त केली हे खरे आहे. काहीही लपलेले नाही. ते रेकॉर्डवर आहे. परंतु, ते शिवजीचे मंदिर होते, याचा उल्लेख त्यात नाही. त्यांनी (हिंदू याचिकाकर्त्यांनी) केसही दाखल केली ज्यात त्यांनी शिवलिंगाचा उल्लेख केलेला नाही, ते इतर हिंदू देवतांबद्दल बोलले. ज्ञानवापी मशिदीतून शिवलिंग मिळाल्यानंतर ते शिवजींचे मंदिर बनले, असे हबीब म्हणाले.

माहिती देताना इतिहासकार इरफान हबीब

हेही वाचा -Video : 'मशीद सौदी अरेबियात जाऊन बनवा', ज्ञानवापीवरून साध्वी प्राची यांचा ओवैसींवर निशाणा..

ज्ञानवापी मशिदीच्या जागेवर हिंदू धर्माशी संबंधित काही शिल्पे आणि आकृती सापडल्याबद्दल हबीब म्हणाले, मला याबद्दल माहिती नाही. पण, हो हे खरे असू शकते. जेव्हा जेव्हा एखादे जुने मंदिर किंवा मशीद बांधली जाते तेव्हा बुद्ध विहारांची दगडे सापडतात. याचा अर्थ असा नाही की त्या आधारे मंदिर किंवा मशीद पाडली पाहिजे. हा निव्वळ मूर्खपणा आहे. आता, ज्ञानवापी मशीद प्रकरणाने राजकीय वळण घेतले आहे, त्यावर मी एक इतिहासकार आहे. येत्या काही दिवसांत काय होईल, याचा अंदाज लावणे तुमचे (माध्यमांचे) काम आहे, असे हबीब म्हणाले.

औरंगजेबाने वाराणसी येथील मंदिर पाडल्याबद्दल पुढे बोलताना हबीब म्हणाले, इतिहासात औरंगजेबाने वाराणसीचे मंदिर उद्ध्वस्त केले आणि केशव राय यांचे मथुरेतील एक मंदिर उद्ध्वस्त केल्याचे स्पष्ट होते. मथुरेत अनेक मंदिरे असली, तरी केशव रायांचे मंदिर, जे खूप मोठे होते औरंगजेबाने नष्ट केले होते. हे मंदिर जहांगीरच्या राजवटीत बीर सिंग बुंदेला यांनी बांधले होते. वाराणसीतील एक आणि मथुरा येथील एक अशी ही दोन मंदिरे औरंगजेबाने उद्ध्वस्त केली, यात शंका नाही. पण, समर्पक मुद्दा असा की, 1670 मध्ये बांधलेल्या वास्तू आता पाडल्या जाऊ शकतात का? हे पूर्णपणे भारतीय स्मारक कायद्याच्या विरोधात आहे, असे सांगत हबीब पुढे म्हणाले की, 1992 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना (हिंदूंना) अयोध्येत जमीन दिली. बाबरी मशीद प्रकरणात निकाल देताना त्यांनी (न्यायालयाने) नवा दृष्टीकोन निर्माण केला. मुस्लिमांचा दृष्टीकोन विचारात घेतला गेला नाही.

हबीब यांनी उदाहरण देखील दिले, राजस्थानमधील चित्तोडगड येथे राणा कुंभाने बांधलेला एक मिनार आहे. मिनारच्या तळाशी हिंदू देवतांची शिल्पे आहेत, तर टॉवरच्या वरच्या भागात अल्लाह, अल्लाह अरबी भाषेत लिहिले आहे. यावर ती मशीद होती आणि मुस्लिमांनी या रचनेवर हक्क सांगावा, असा त्याचा अर्थ होतो. तो निव्वळ मूर्खपणा असेल, असे इतिहासकार हबीब म्हणाले.

हेही वाचा -केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांनी कुतुबमिनारच्या उत्खननाचा दावा फेटाळला

ABOUT THE AUTHOR

...view details