नवी दिल्ली- दिल्ली हाईकोर्टाने अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या जीवनावर चित्रपट किंवा डॉक्युमेंट्री बनविण्यावर बंदी घालण्याची मागणी फेटाळण्यात आली आहे. ही याचिका सुशांतचे वडील कृष्ण किशोर सिंह यांनी केली होती. सर्व पक्षांचे युक्तिवाद ऐकून कोर्टाने 2 जून रोजी या प्रकरणात निर्णय राखून ठेवला होता. जस्टिस संजीव नरुला यांनी हा निर्णय दिला.
चित्रपटाचा सुशांतच्या जीवनाशी संबंध नाही -
सुनावणी दरम्यान, शशांक चित्रपटाच्या निर्मात्यांकडून वकील एपी सिंह यांनी पक्ष मांडला. ते म्हणाले, चित्रपटाचा सुशांत सिंह राजपूतच्या जीवनाशी काहीच संबंध नाही. 22 एप्रिल रोजी शशांक चित्रपटाच्या निर्मात्यांनी कोर्टात जबाब नोंदवला. तसेच त्यांनी म्हटलं होतं की दिल्ली न्यायालयाला या याचिकेवर सुनावणी अधिकार नाही. एपी सिंह म्हणाले, की चित्रपटाचं नाव आणि त्यातील पात्रांची नाव सुशांतच्या कुटुंबीयांच्या नावाशी मिळती-जुळती नाही. तसेच सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास आणि घटनाक्रम मुंबईत असल्याने दिल्ली न्यायालयाला या याचिकेवर सुनावणी करण्याचा अधिकार नाही.
या 20 एप्रिल रोजी हाईकोर्टाने सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना म्हटलं की, फिल्म निर्मात्या सरला ए सरावगी यांना नोटीस पाठवण्यात आली होती. सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्यांकडून वकील विकास सिंह यांनी पक्ष मांडला. यावेळी ते म्हणाले, की सुशांत सिंह राजपूतच्या जीवनावर काही लोक चित्रपटाची निर्मिती करत आहेत. आणि हे करताना ते सुशांतच्या कुटुंबीयांच्या प्रतिमेचा विचार न करता नाव कमवण्याचा प्रयत्न करत आहेत.