नवी दिल्ली- कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियन्टने सरकारची चिंता वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ८ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांना कंटेन्टमेंट क्षेत्र घोषित करणे, गर्दी टाळणे, मोठ्या प्रमाणात टेस्टिंग करणे व डेल्टा प्लस आढळलेल्या जिल्ह्यांमध्ये लसीकरण वाढविण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या आहेत. असे असले तरी आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी डेल्टा प्लसचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्राला पत्र पाठविले नाही.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी तामिळनाडू, राजस्थान, कर्नाटक, पंजाब, आंध्र प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, गुजरात आणि हरियाणा या राज्यांना पत्र पाठवून डेल्टा प्लस नियंत्रणात आण्यासाठी सूचना केल्या आहेत. कोरोनाबाधितांचे नमुने हे इंडियन सार्स कोव्ह-२ जिनोमॅक कॉन्सॉर्टिया (इन्साकॉग) प्रयोगशाळेत पाठवावेत, अशी त्यांनी पत्रात राज्यांना विनंती केली आहे. या नमुन्यांमुळे महामारीमधील वैद्यकीय संबंध समजू शकेल असे आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी म्हटले आहे.
हेही वाचा-जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन विशेष: सहा महिन्यात आर्थिक राजधानीत 43 कोटींची कारवाई
डेल्टा प्लसने वाढविली चिंता-
डेल्टा प्लसचे रुग्ण हे तिरुपती (आंध्र प्रदेश), सुरत (गुजरात), फरिदाबाद (हरियाणा), कात्रा (जम्मू आणि काश्मीर, बिकानेर (राजस्थान), पतियाला आणि लुधियाना (राजस्थान), म्हैसुरू (कर्नाटक) आणि तामिळनाडूमधील चेन्नई, मदुराई व कांचीपुरम येथे आढळले आहेत. डेल्टा प्लस व्हेरियंट हा व्हेरियंट ऑफ कन्सर्न (variant of concern) आहे. कारण, त्यामध्ये संसर्गाची अधिक क्षमता, फुफ्फुसांच्या पेशींना अधिक चिकटणे आणि शरीरातील प्रतिकारक्षमता कमी करण्याची क्षमता आहे. या जिल्ह्यांमध्ये कंटेन्टमेंट क्षेत्राच्या उपाययोजना कराव्यात व गर्दी टाळावी, अशा विविध उपाययोजना राजेश भूषण यांनी सूचविल्या आहेत.
हेही वाचा-सूत्रे आमच्या हाती द्या, तीन महिन्यात ओबीसींना आरक्षण देतो.. नाहीतर राजकीय संन्यास घेईल - फडणवीस