बेंगळुरू : ऑनलाइन पद्धतीने महागड्या वस्तू मागवणे कितपत सुरक्षित आहे, असा प्रश्न उपस्थित करणारी एक घटना बेंगळुरूमध्ये घडली आहे. दोन डिलिव्हरी बॉय पत्त्यावर न पोहोचता 5 आयफोन आणि 1 अॅपल घड्याळ त्यांनी चोरले आहे. याप्रकरणी मध्य विभागाच्या सीईएन ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
५ आयफोन आणि एक अॅपल घड्याळ : अरुण पाटील आणि नयन असे या दोन डिलीवरी बॉयचे नाव आहेत. हे दोघे सहा आयफोन आणि अॅपल घड्याळे माझ्या पत्त्यावर न देता पळून गेल्याची तक्रार तस्लीम आरिफ यांनी केली आहे. तक्रारदाराने ५ मार्च रोजी सुनाकल येथील एका दुकानातून ५ आयफोन आणि एक अॅपल घड्याळ खरेदी केले आणि विजयनगर येथील त्यांच्या दुकानाच्या पत्त्यावर पोहोचवण्यासाठी डॅनजो डिलिव्हरीचा पर्याय निवडला होता. त्यामध्ये ही घटना घडली आहे.
मध्य विभागाच्या सीईएन स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : नयनने काही वेळाने मला फोन केला आणि सांगितले की, अरुण पाटील नावाच्या डिलिव्हरी बॉयने, ज्याला दुकानातून पार्सल मिळाले होते, त्यांनी ते पार्सल कार्ड रोडच्या पश्चिमेला त्याच्याकडे दिले आहे आणि ते लवकरच तुमच्या पत्त्यावर पोहोचेल. मात्र, दोघांनीही पार्सल पत्त्यावर परत केलेले नाही. तस्लीमने फोन केला असता दोघांनीही आपले मोबाईल बंद केले होते. सध्या, तस्लीमने दिलेल्या तक्रारीच्या आधारे मध्य विभागाच्या सीईएन स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
हा प्रकार बेंगळुरू येथे घडला : घरातील वस्तू असो वा इतर कोणत्याही असो. त्याचबरोबर कपडे असतील, खाण्याच्या गोष्टी असतील किंवा शिक्षणाशी संबंधीत असतील हे सर्व सध्या सर्वच ऑनलाईन पद्धतीने मागवल्या जात आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश आहे. यामध्ये ऑनलाईन सेवा देणारे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सर्वजन आपल्या-आपल्या आवडीनुसार त्याची निवड करतो. दरम्यान, या ऑनलाइन पद्धतींवर आता अनेक ठिकाणी विश्वास ठेवावा की नाही अशी शंका उपस्थित करणारे प्रकार घडत आहेत. तसाच हा प्रकार बेंगळुरू येथे घडला आहे. त्यामध्ये पोलिसांनी तपास सुरु केला आहे. परंतु, हे प्रकार टाळण्यासाठी खात्री करावी असेही पोलीस म्हणाले आहेत.
हेही वाचा :Bhushan Desai Join Shiv Sena : उद्धव ठाकरेंचे खंद्दे समर्थक सुभाष देसाईंचे पुत्र भूषण देसाई मुख्यमंत्री शिंदेंसोबत