महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Vande Bharat Express Accident : वंदे भारत एक्स्प्रेस बैलाला धडकली, अपघातात ट्रेनचे मोठे नुकसान - दिल्ली अजमेर वंदे भारत एक्स्प्रेस

दिल्लीहून अजमेरला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसने राजस्थानमध्ये एका बैलाला धडक दिली. यात ट्रेनचे नुकसान झाले आहे. रेल्वे अभियंत्यांनी रात्रभर दुरुस्तीचे काम पूर्ण केले, त्यानंतर रेल्वेचे कामकाज सुरू झाले.

Vande Bharat Express Accident
वंदे भारत एक्स्प्रेसचा अपघात

By

Published : May 20, 2023, 3:43 PM IST

अलवर (राजस्थान) : दिल्ली-अजमेर दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस शुक्रवारी रात्री बांदिकुई स्थानकाजवळ एका बैलाला धडकली. या धडकेत गाडीच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे. अभियंत्यांनी रात्रभरातून ट्रेन दुरुस्त केली. त्यानंतर शनिवारी सकाळी रेल्वे पुन्हा रुळावर धावू लागली. ट्रेन आणि बैलाची टक्कर इतकी वेगवान होती की ट्रेनच्या एअर ब्रेकसह इंजिनमधील अनेक गोष्टींचे नुकसान झाले.

रेल्वेच्या धडकेत बैलाचा मृत्यू : या प्रकरणाची माहिती रेल्वेचे अभियंते व अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. बांदिकुई स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर बैलाचा मृतदेह रेल्वे रुळावरून काढण्यात आला. अभियंत्यांनी ट्रेन तपासली आणि त्यानंतर गाडी जयपूरला रवाना करण्यात आली. या दरम्यान ट्रेन सुमारे 15 मिनिटे थांबली होती. यामुळे ट्रेनमधील प्रवाशांमध्ये काही काळासाठी अस्वस्थतेचे वातावरण होते. रेल्वे अभियंत्यांनी रात्री ट्रेनच्या दुरुस्तीचे काम केले आणि शनिवारी सकाळी ट्रेनचे कामकाज पुन्हा सुरू झाले.

ट्रेनचे नुकसान झाले : रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्ली-अजमेर रेल्वे मार्गावर पहिल्यांदाच वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे नुकसान झाले आहे. या आधीही अनेक किरकोळ घटना घडल्या आहेत, मात्र ट्रेनच्या इंजिनला काही बिघाड झालेला नव्हता. रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शशी किरण यांनी सांगितले की, दिल्ली - अजमेर रेल्वे मार्गावर पहिल्यांदाच ट्रेनचे इंजिन खराब झाले आहे. अभियंत्यांनी रात्रभर दुरुस्तीचे काम पूर्ण केले. त्यानंतर रेल्वेचे कामकाज सुरू झाले आहे.

प्राण्यांना रुळापासून दूर ठेवण्याचे आवाहन : रेल्वे अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना पाळीव प्राणी व भटक्या प्राण्यांना रेल्वे ट्रॅकपासून दूर ठेवण्याचे आवाहन केले आहे. कारण हे प्राणी रेल्वेला धडकल्यास रेल्वेचे नुकसान होते. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होते. यासाठी रेल्वेचे कर्मचारी रेल्वे रुळावर रेल्वेच्या बाजूने गस्त घालतात. सोबतच सतत देखरेखही केली जाते, मात्र त्यानंतरही जनावरे रेल्वे रुळावर येतात.

हेही वाचा :

  1. Karnataka CM Oath Ceremony : सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री तर डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री पदाची घेतली शपथ
  2. KCR On BRS Model In Country : विकासाचे बीआरएस मॉडेल भारतभर नेणार; बीआरएसने सुरू केली 288 मतदार संघात लढण्याची तयारी - केसीआर
  3. Child At King Charles Coronation : राजा चार्ल्सच्या राज्याभिषेकासाठी 'या' सात वर्षांच्या मुलाला बोलावले होते, जाणून घ्या काय आहे खास

ABOUT THE AUTHOR

...view details