नवी दिल्ली- दिल्लीच्या विशेष न्यायालायाने ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलॉकॉप्टर घोटाळ्यातील कथित दलाल ख्रिश्चन मिशेल याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. दिल्लीच्या विशेष न्यायालयाने मिशेल याचा जामिन अर्ज सीबीआय आणि ईडीच्या दोन्ही प्रकरणामध्ये फेटाळला आहे.
ब्रिटिश नागरिक असलेल्या ख्रिश्चन मिशेल याचे संयुक्त अरब अमिरातीने २०१८ मध्ये भारताकडे प्रत्यार्पण केले होते. आरोपी हा दिल्लीच्या तिहार तुरुंगात कैदेत आहे. त्याची सुटका करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या वर्किंग ग्रुप ऑन आर्बिटेरी डिटेन्शनचा भारत सरकारवर दबाव आहे. ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव डोमिनिक रॅब यांनी २०२० मधील भारत दौऱ्यात ख्रिश्चन याला ताब्यात घेतल्यावरून परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम शंकर यांच्याकडे प्रश्न उपस्थित केला होता.
हेही वाचा-कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे उत्पादनात 2 लाख कोटींचे नुकसान : आरबीआय लेख
२०१९ मध्ये मुख्यमंत्री योगी यांनी मिशेवरून काँग्रेसवर केली होती टीका
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील आरोपी ख्रिश्चन मिशेल हा राहुल गांधींचा 'शकुनी मामा' असल्याची टीका २०१९ मध्ये केली होती. देशात काहीही पेचप्रसंग निर्माण झाला की, राहुल गांधी इटलीला जातात, असा दावा योगींनी केला होता.