मुंबई : खराब हवामानामुळे गुरुवारी दिल्ली-शिर्डी स्पाइस जेट विमान एसजी953 च्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा ( delhi shirdi spice jet flight stuck ) लागला. सुमारे पाच तास प्रवासी विमानात अडकले होते. विमान शिर्डीला पोहोचल्यानंतरही ते विमानतळावर उतरू शकले ( spice jet flight stuck due to bad weather ) नाही. कधी खराब हवामान तर कधी तांत्रिक कारणे दिली गेली. दिल्लीहून उड्डाण केल्यानंतर दुपारी साडेचार वाजता हे विमान शिर्डी विमानतळावर उतरणार होते. मात्र ते वेळेवर पोहोचले नाही.
विमान शिर्डीऐवजी मुंबईकडेवळवण्यात ( delhi shirdi flight landed in mumbai ) आले. शिर्डीला जाणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. खराब हवामानामुळे मार्ग बदलावा लागला. प्रवासी आणि विमानाच्या सुरक्षेचा विचार करून हे करण्यात आल्याचे स्पाईसजेटकडून स्पष्ट करण्यात आले.