नवी दिल्ली :वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानं अत्याचार केल्यानं अत्याचार पीडिता गरोदर राहिल्याचा धक्कादायक प्रकार दिल्लीत सोमवारी उघड झाला. याप्रकरणी अत्याचार पीडितेला भेटण्यास रुग्णालयात गेलेल्या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना पीडितेला भेटण्यापासून रोखण्यात आल्यानं मोठा गोंधळ उडाला. त्यामुळे दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी दिल्ली सरकारविरोधात धरणं आंदोलन सुरू केलं आहे. या घटनेतील नराधम प्रेमोदय खाका हा दिल्ली महिला व बालविकास विभागात उपसंचालक आहे. दरम्यान स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. दिल्ली पोलीस आहेत, की गुंड असा आरोपही स्वाती मालीवाल यांनी यावेळी केला आहे.
स्वाती मालीवाल यांचे दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप :स्वाती मालीवाल यांनी दिल्ली अत्याचार प्रकरणातील पीडितेला भेटण्यासाठी रुग्णालयात धरण आंदोलन सुरु केलं होतं. दिल्ली पोलिसांनी स्वाली मालीवाल यांना रुग्णालयात पीडितेची भेट घेण्यास रोखल्यानं त्यांनी दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. अखेर दिल्ली पोलिसांनी स्वाती मालीवाल यांना पीडितेची भेट घेण्यास रुग्णालयात जाण्यास परवनगी दिली आहे.
काय आहे अत्याचार प्रकरण ? :दिल्लीतील महिला व बाल कल्याण विभागातील उपसंचालक असलेल्या प्रेमोदय खाका ( वय 51 ) यानं एका अल्पवयीन तरुणीवर अत्याचार केले होते. या अल्पवयीन तरुणीवर वारंवार अत्याचार केल्यानं ती गरोदर राहिली. या अत्याचारात नराधम प्रेमोदय याला त्याची पत्नी सीमा राणीनं मदत केली होती. दिल्लीतील महिला व बाल कल्याण विभागातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यानं अशाप्रकारचं अल्पवयीन तरुणीचं लैंगिक शोषण केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.