महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

स्वातंत्र्यदिन दोन दिवसांवर असताना दिल्ली पोलिसांची कारवाई; चार जणांकडून 55 पिस्तुलांसह 50 काडतूस जप्त - स्वतंत्रता दिवस

स्वातंत्र्यदिन दोन दिवसांवर ठेपला असताना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. पोलिसांनी चार आरोपींनाही अटक केली आहे.

दिल्ली पोलिसांची कारवाई
दिल्ली पोलिसांची कारवाई

By

Published : Aug 13, 2021, 7:20 PM IST

Updated : Aug 13, 2021, 7:29 PM IST

नवी दिल्ली - स्वातंत्र्य दिनापूर्वी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सुरक्षेच्या दृष्टीने मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी 55 पिस्तूल आणि 50 जिवंत काडतूस जप्त केली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. राजवीर सिंह, धीर, विनोद आणि धर्मेंद्र अशी आरोपींची नावे आहेत.

स्वातंत्र्यदिन दोन दिवसांवर आला असताना दिल्लीच्या स्पेशल सेलला मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी आरोपींकडून मोबाईल फोन, सीम कार्डही जप्त केले आहे. अटकेतील आरोपी हे आंतरराज्य शस्त्रतस्करी टोळीतील आहेत.

हेही वाचा-गोवा : भाजपातील अंतर्गत बंडाळी चव्हाट्यावर.. दोन मंत्रीच डिजीटल मीटरवरून आमने-सामने

अशी झाली आरोपींना अटक-

अटकेतील आरोपीपैकी एकाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. त्याची सध्या पॅरोलवर सुटका करण्यात आली आहे. दुसरा आरोपी हा कुप्रसिद्ध कौशल गँगमधील आहे. हा आरोपी हरियाणा आणि दिल्लीमधील दोन खून प्रकरणात मोस्ट वाँटेड आहे. राजबीर आणि धीरज यांना बुरारी येथे 7 ऑगस्टला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आरोपी विनोदला नझफगड येथून 9 ऑगस्ट आणि धर्मेंद्रला द्वारका येथून शुक्रवारी अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा-देशांतर्गत विमान प्रवास महाग! केंद्राकडून विमान तिकिट दरात 12.5 टक्क्यांची वाढ

स्वातंत्र्य दिनानिमित्त स्पेशल सेलकडून काम सुरू

जप्त केलेल्या शस्त्रसाठ्यासंदर्भात पोलीस हे अटकेतील आरोपींची चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार स्वातंत्र्य दिनानिमित्त स्पेशल सेलकडून काम सुरू होते. काही आरोपींकडून शस्त्रांची तस्करी होत असल्याची सेलला माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून स्पेशल सेलने चार आरोपींना अटक केली आहे.

हेही वाचा-पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाँच केले राष्ट्रीय ऑटोमोबाईल स्क्रॅपेज धोरण, 'हे' होणार फायदे

Last Updated : Aug 13, 2021, 7:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details