नई दिल्ली/मुंबई: दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने हेरॉईनच्या एका मोठ्या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मुंबईत कारवाई करीत २० टनांहून अधिक हेरॉईन जप्त केले आहे. अलीकडच्या काळात देशात झालेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. ( more than 20 tons heroin recovered )
heroin seized in mumbai 20 टन हेरॉईन जप्त, दिल्ली पोलिसांची मुंबईत कारवाई
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने हेरॉईनच्या एका मोठ्या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मुंबईत कारवाई करीत २० टनांहून अधिक हेरॉईन जप्त केले आहे. ( more than 20 tons heroin recovered )
हेरॉईन कंटेनरमधून आणले -नवी मुंबई जवळील उरण परिसरात असणाऱ्या न्हावा शेवा बंदरात कंटेनरमधून दिल्लीला नेण्यात येत असलेले हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. तब्बल 22 टन हेरॉईनची तस्करी झाली होती.
1 हजार 725 कोटींचे हेरॉईन जप्त -न्हावा शेवा बंदरातून जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनची किंमत तब्बल एक हजार 725 कोटी रुपये इतकी असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे सीपी एचजीएस धारीवाल यांनी दिली आहे. जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनपैकी या अगोदर एक कंटेनर हेरॉईन दिल्लीला नेण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.