नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी संध्याकाळी मांसाहारावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये हिंसक हाणामारी झाली. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले. ABVP सदस्यांनी रामनवमीच्या दिवशी पूजेला परवानगी न दिल्याचा आरोप डाव्या गटावर केला आहे. ते म्हणाले की, रामनवमीला विद्यार्थ्यांनी पूजा व हवन ठेवले होते. (Fighting between two groups at JNU) डाव्या विचारसरणीच्या लोकांनी तेथे पोहोचल्यानंतर त्यांना पूजा करू दिली नाही. तसेच, नंतर त्यांनी जेवणाच्या मुद्द्यावरून वाद सुरू केला. या प्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात आला आहे.
रामनवमी आणि इफ्तार पार्टी एकत्र होती -जेएनयूच्या कावेरी हॉस्टेलमध्ये रामनवमी आणि इफ्तार पार्टी एकत्र होती. इफ्तार पार्टीत मांसाहारही ठेवण्यात आला होता. यावरून वाद सुरू झाला. एका गटाने सांगितले की, पूजेच्या दिवशी मांसाहार मेनूमध्ये ठेवू नये. जेवणावरून दोन गटांत झालेल्या चर्चेचे रूपांतर हाणामारीत झाले. जेएनयू विद्यार्थी संघ आणि डाव्या विंगच्या विद्यार्थ्यांनी एबीव्हीपीवर मांसाहारावर बंदी घातल्याचा आरोप केला आहे. ही घटना जेएनयूच्या कावेरी वसतिगृहात घडली. इथे दर रविवारी खास जेवणात मांसाहार दिला जातो.
विद्यार्थ्यांसोबत केले जेवण -या गोंधळानंतर जेएनयूचे डीन सुधीर प्रताप कारवाई करताना दिसले. त्यांनी कावेरी वसतिगृहात ABVP आणि डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांसोबत जेवण केले. दोन्ही गटांना शांत करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. विद्यार्थ्यांचे कुलगुरू डीन यांनी कावेरी वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. येथे जेएनयू वादावर, विहिंपचे प्रवक्ते विनोद बन्सल म्हणाले की, कोणीही प्राणघातक हल्ला केल्याचे समोर आलेले नाही.