पालघर - श्रद्धा खून प्रकरणाच्या ( Shraddha Murder Case ) तपासासाठी दिल्ली पोलिसांचे ( investigate Shraddha murder case ) पथक वसई, पालघर येथे पोहोचले ( Delhi Police reached Vasai Palghar ) आहे. या पथकाने स्थानिक माणिकपूर पोलिसांच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली असून तपासात त्यांची मदत घेतली जात आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपी आफताबने दिल्ली पोलिसांसमोर अनेक महत्त्वाची माहिती दिली आहे. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने सांगितले की, त्याला गांजा ओढण्याचे व्यसन आहे. याबाबत श्रद्धा अनेकदा बोलायची. यावरून दोघांमध्ये भांडण व्हायचे. आफताबने सांगितले की, ज्या दिवशी श्रद्धाची हत्या झाली त्या दिवशी तो गांजाच्या नशेत होता.
दिल्ली पोलीस महाराष्ट्रात -या हत्येचा तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांनी गेल्या शनिवारी आफताबला ताब्यात घेतले होते. यानंतर न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. गुरुवारी दिल्लीतील साकेत न्यायालयाने आफताबला पुन्हा पाच दिवसांसाठी पोलिसांच्या ताब्यात दिले. खून आणि मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी वापरलेले हत्यार आणि श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे पोलिसांना शोधावे लागणार आहेत. मात्र, या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी दिल्ली पोलीस महाराष्ट्रात पोहोचले आहेत.
वसईजवळ राहत होती श्रद्धा वालकर-दिल्ली पोलिसांनी बुधवारी सांगितले होते की, त्यांच्या टीमने वसई, पालघर जिल्ह्यांतील पोलिसांशी संपर्क साधला नाही, पण लवकरच वसई, पालघरच्या पोलिसांशीही संपर्क साधला जाईल. श्रद्धा वालकर वसईजवळ राहायची. मीरा-भाईंदर वसई विरार (MBVV) पोलीस अधिकाऱ्याने सांगितले होते की, आफताब अमीन पूनावाला यांना गेल्या शनिवारी अटक करण्यात आली होती, त्यानंतर त्यांच्यात, दिल्ली पोलिसांमध्ये कोणताही संवाद झालेला नाही.