महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Raids at Sitaram Yechury residence : सीताराम येचुरी यांच्या निवासस्थानावर छापा, न्यूजक्लिक लिंकला चीनच्या फंडिंगवरुन संशय - सिताराम येचुरी

Raids at Sitaram Yechury residence : न्यूज क्लिकच्या पत्रकाराना चीनमधून फंडिंग होत असल्याचा संशय आहे. त्यानुसार सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाशी संबंधित दिल्ली पोलिसांनी केली आहे. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, 30 हून अधिक ठिकाणी छापेमारी सुरू आहे. यामध्ये सिताराम येचुरी यांच्या निवासस्थानी संशयावरुन छापा टाकण्यात आला.

सीताराम येचुरी
सीताराम येचुरी

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 3, 2023, 5:55 PM IST

नवी दिल्लीRaids at Sitaram Yechury residence:दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मंगळवारी छापेमारी केली. सीपीआय-एम नेते सीताराम येचुरी यांच्या न्यूजक्लिकशी संबंधित संस्थांमध्ये सहभाग असल्याच्या संशयावरून त्यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला. या ठिकाणी राहणाऱ्या एका व्यक्तीकडून न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार भारतविरोधी प्रचार चालवण्यासाठी चिनी निधी मिळत असल्याचा आरोप केला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाशी संबंधित एक व्यक्ती या परिसरात राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, 30 हून अधिक ठिकाणी छापेमारी सुरू आहे. "न्यूजक्लिकशी संबंधित वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले जात आहेत, अद्याप कोणालाही अटक झालेली नाही," असे पोलिस सूत्रांनी सांगितले. न्यूज क्लिकचे कार्यालय सील करण्यात आले आहे.

ऑगस्टमध्ये, न्यू यॉर्क टाईम्सच्या बातमीत काही गोष्टी स्पष्ट केल्यानंतर न्यूजक्लिक भोवती संशयाचं जाळ निर्माण झाल होतं. हे पोर्टल अशा संस्थांपैकी एक होतं ज्यांना अमेरिकन लखपती नेव्हिल रॉय सिंघम यांच्याशी जोडलेल्या नेटवर्कद्वारे निधी दिला जात होता. ज्यामधून चिनी अजेंडा राबवला जातो असा आरोप आहे. यासंदर्भात सिताराम येचुरी यांनी विचारले असता. न्यूज क्लिमध्ये काम करणाऱ्या एकाचे वडिल आमच्या कार्यालयात काम करतात. त्यांच्या लॅपटॉप पाहण्यासाठी पोलीस आले होते. पण ज्या पद्धतीनं ही कारवाई सुरू आहे, ते योग्य नाही, असंही येचुरी म्हणाले. ही माध्यमांची मुस्कटदाबी असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 2021 मध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी न्यूज पोर्टल आणि त्याच्यासंदर्भातील इतर गोष्टी प्रकाशझोतात आल्या होत्या. अंमलबजावणी संचालनालयाचा खटला याच प्रकरणावर आधारित होता. दिल्ली उच्च न्यायालयाने NewsClick प्रवर्तकांना अटकेपासून संरक्षण दिले आहे, आता हे प्रकरण न्यायालयात आहे. आयकर अधिकाऱ्यांनी 2021 मध्ये कथित करचोरी प्रकरणात न्यूज पोर्टलच्या कार्यालयांचीही झडती घेतली होती.

प्रेस क्लब ऑफ इंडियाने या एकूणच प्रकरणावर चिंता व्यक्त केली आहे. प्रेसक्लबच्या वतीनं X वरील एका पोस्टमध्ये असं म्हटलय की, "#Newsclick शी संबंधित पत्रकार आणि लेखकांच्या घरांवर छापे टाकल्याबद्दल प्रेस क्लब ऑफ इंडिया अत्यंत चिंतेत आहे. आम्ही सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत आणि तपशीलवार निवेदन जारी करणार आहोत."

सीताराम येचुरी यांची चीनमधील कम्युनिस्ट पक्षातील नेत्यांसोबत असलेली जवळीक जगजाहीर आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षासोबत 'ओव्हरबोर्ड' जात असल्याचा आरोप त्यांच्यावर अनेकदा झाला आहे. याबाबतीत त्यांनी पक्षातील सहकारी आणि या बाबतीत थोडे 'संयमी' असलेले सहकारी नेते प्रकाश करात यांनाही मागे टाकल्याचं बोललं जातं.

येचुरी यांनी 2021 मध्ये, चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दीनिमित्त अभिनंदन करण्यात पुढाकार घेतला होता. येचुरी यांनी कोरोना नंतर चीनने अर्थव्यवस्थेला वाढीच्या मार्गावर आणणे हा “जगासाठी धडा” असल्याचे नमूद केले होते. शी जिनपिंग यांनाही याबाबत येचुरी यांनी कौतुकाचं पत्र पाठवलं होतं.

त्यानंतर 2022 मध्ये, येचुरी यांनी अमेरिकेच्या वर्चस्वाला विरोध केल्याबद्दल चीनचं कौतुक केलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या नेतृत्वाखाली भारत अमेरिकेशी एकनिष्ठ असल्याचा आरोप केला होता. भाजपा सरकार सत्तेवर आल्यानंतर भारताने अमेरिकेची शरणागती पत्करली. अमेरिका चीनला एकाकी पाडण्याचा प्रयत्न करत असताना चीन अमेरिकेच्या वर्चस्वाला विरोध करत आहे, असं येचुरी म्हणाले होते. येचुरी यांनी घेतलेल्या चीनचे राजदूत लुओ झाओहुई यांच्या भेटीवरही येचुरी यांच्यावर विरोधकांनी टीका केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details