महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

रॉबर्ट वड्रा यांनी अचानक मारला कारचा ब्रेक; दिल्ली पोलिसांनी पाठविले चलन - रॉबर्ट वड्रा

रॉबर्ट वड्रा यांना दिल्ली पोलिसांनी दंड भरण्यासाठी चलन पाठविले आहे. त्यांनी नियमभंग केल्याचे वरिष्ठ दिली पोलीस अधिकाऱ्याने म्हटले आहे.

Robert Vadra
रॉबर्ट वड्रा

By

Published : Jun 25, 2021, 3:35 PM IST

नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांनी काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांना चलन पाठविले आहे. धोकायदायक आणि निष्काळजीपणाने वाहन चालविण्याने हे चलन पाठविण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.

वरिष्ठ दिल्ली पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार वड्रा यांच्या कारला दक्षिण-पश्चिमेमधील बारापुल्लाह उड्डाणामागे दुसऱ्या वाहनाने धडक दिली. या अधिकाऱ्याच्या माहितीनुसार वड्रा हे बुधवारी सकाळी ऑफिसला जात होते. तेव्हा त्यांच्याबरोबर सुरक्षा रक्षक हे दुसऱ्या वाहनाने जात होते. अचानक वड्रा यांनी ब्रेक मारला. त्याचा परिणाम म्हणून मागील सुरक्षा पथकातील टीमच्या कारने वड्रा यांच्या कारला धडक दिली. या घटनेनंतर वाहतूक पोलिसांनी त्यांना चलन पाठविले आहे.

हेही वाचा-पुरुष की महिला.. 'छिंदर पाल कौर', पुरुषाचे कपडे घालून महिला चालवते रिक्षा

कोण आहेत रॉबर्ट वड्रा?

रॉबर्ट वड्रा यांच्यावर लंडनमध्ये संपत्ती खरेदी केल्याचा आरोप आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी रॉबर्ट वाड्रा हे चारहून अधिक वेळा ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले होते. त्यांनी लंडनमध्ये कोणतीही संपत्ती नसल्याचा दावा केला होता. वड्रा यांच्या पत्नी प्रियांका गांधी यांचा दोन वर्षापूर्वी सक्रिय राजकारणात प्रवेश झाला आहे.

हेही वाचा-आणीबाणीतील काळ्या दिवसांचे विस्मरण कधीच होऊ शकत नाही- पंतप्रधान मोदी

ABOUT THE AUTHOR

...view details