नवी दिल्ली :जागतिक तापमानवाढीविरोधात लढा देणाऱ्या ग्रेटा थनबर्ग या मुलीविरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. भारतात सुरू असलेल्या कृषी कायदे विरोधी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे ट्विट केल्यामुळे ही कारवाई केल्याचे म्हटले जात आहे. रिहाना या आंतरराष्ट्रीय पॉप स्टारने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे ट्विट केल्यानंतर ग्रेटानेही याबाबत ट्विट केले होते.
रिहानाच्या ट्विटनंतर ग्रेटाने केले ट्विट..
रिहानाच्या ट्विटनंतर ग्रेटा सोबत इतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध व्यक्तींनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. तसेच, या शेतकऱ्यांवर आणण्यात येणारा दबावाविरोधातही त्यांनी आवाज उठवला होता. ग्रेटाने दिल्लीमध्ये केलेले इंटरनेट बॅन ही नागरिकांच्या अधिकारांची पायमल्ली असल्याचे म्हणत या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता.